धर्मवीर संभाजी चौकात दिवसही चमकत आहेत मनपाचे तारे या आशयाखाली धर्मवीर संभाजी चौकात दिवसाढवळ्या सुरू असणारा फोकस याबाबतची बातमी बेळगाव Liveने दिली होती या बातमीचा तात्काळ इम्पॅक्ट झाला असून मनपाने याची दखल घेत तात्काळ दिवसाढवळ्या सुरू असणारा फोकस बंद केला आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत ठिकठिकाणी बसवण्यात आलेले पथदीप, बंद अवस्थेतील डेकोरेटिव्ह पोल आणि त्यांची निगा राखण्यात महानगरपालिका कमी पडत असून सायंकाळच्या वेळी पथदीप तसेच विद्युत फोकस लावणे आणि पहाटेच्या वेळी ते बंद करणे महत्वाचे आहे. मात्र याबाबाबत देखील दुर्लक्ष होत असल्याचे धर्मवीर संभाजी चौकातील प्रकारावरून दिसून आले होते.
शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास देखील धर्मवीर संभाजी चौकातील फोकस सुरूच होता. ही बाब बेळगाव लाईव्ह ने बातमीच्या माध्यमातून दर्शवून दिली होती सदर बातमीचा इम्पॅक्ट झाला असून मनपाचे डोळे उघडले आणि तात्काळ धर्मवीर संभाजी चौकातील तो सुरू असणारा फोकस बंद करण्यात आला.
पथदिपा अभावी नागरिकांची गैरसोय होत आहे सातत्याने पाठपुरावा करून देखील ते बसवण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मात्र आठवड्यातून एकदा अथवा दोन वेळा शहरात ठिकठिकाणी बसवण्यात आलेले पथदीप सुरूच असल्याचा प्रकार नागरिकांच्या निदर्शनास येतो.
हि बाब प्रशासनाच्या निदर्शनात येत नसून दिवसाढवळ्या सुरू असणारा फोकस नागरिकांचे चांगलेच लक्ष वेधून घेत असल्याचे दिसून आले होते.
धर्मवीर संभाजी चौकात दिवसाही चमकत आहेत ‘मनपाचे’ तारे!