Thursday, December 19, 2024

/

भातकांडे गल्ली, गंगानगर गणरायांचे झाले विसर्जन

 belgaum

बेळगाव शहरातील पारंपारिक श्री गणेशोत्सव मिरवणुकीला आज शुक्रवारी श्री गणेश चतुर्थी दिवशी सायंकाळी प्रारंभ होणार आहे. मात्र तत्पूर्वी आज दुपारीच शहरातील भातकांडे गल्ली व गंगानगर येथील सार्वजनिक श्री गणेश मूर्तींचे कपिलेश्वर तलावात मोठ्या भक्तीभावाने उत्साहात विसर्जन करण्यात आले.

बेळगाव शहरात आज सायंकाळी होणाऱ्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या तयारीची धामधूम सुरू आहे. मात्र दरम्यानच्या काळात शहरातील भातकांडे गल्ली येथील श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रीमूर्ती विसर्जन सोहळ्याला आज सकाळी 8 वाजताच प्रारंभ करण्यात येऊन दुपारी 1:15 च्या सुमारास कपिलेश्वर तलावामध्ये मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पारंपरिक पद्धतीने श्रीमुर्तीचे विसर्जन केले.

श्री अनंत चतुर्दशी दिवशी सकाळीच भातकांडे गल्ली येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या मंडपातील बाप्पाच्या विसर्जन सोहळ्याला पाहुणे म्हणून बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बनके यांच्या हस्ते गणरायाच्या मूर्तीचे पूजन व आरती करून प्रारंभ करण्यात आला.

त्यानंतर वाजत गाजत बाप्पाची मूर्ती कपिलेश्वर तलाव येथे आणून विधिवत परंपरेनुसार तिचे आज दुपारी 1:15 वाजण्याच्या सुमारास विसर्जन करण्यात आले. त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या! असा जयघोष करत त्याला परिसर दणाणून सोडला होताGanesh visarjan

भातकांडे गल्ली येथील सार्वजनिक श्री गणेश उत्सव मंडळाच्या गणेश मूर्ती मागोमाग शहरातील गंगानगर येथील सार्वजनिक श्री गणेश मूर्तीचे देखील विसर्जन करण्यात आले.

या पद्धतीने भातकांडे गल्ली आणि गंगानगर येथील सार्वजनिक श्री गणेश उत्सव मंडळांनी आज दुपारी सर्वप्रथम मूर्ती विसर्जनाचा मान मिळवला. श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी कपिलेश्वर तलाव आणि कपलेश्वर तीर्थ सुसज्ज ठेवण्यात आले असून कपिलेश्वर तलावाच्या ठिकाणी 6 क्रेन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह सिद्ध ठेवण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.