बेळगावच्या किल्ला परिसरात बिबट्या सदृश्य प्राणी आढळल्याची शक्यता असल्याच्या धास्तीने कर्नाटका दोन्ही प्रवेशद्वारातून मॉर्निंग व किल्ल्याची दोन्ही प्रवेशद्वारे बंद केली आहेत. या पार्श्वभूमीवर खरोखरच किल्ला परिसरात बिबट्या सदृश्य प्राणी आहे की नाही असा संभ्रम निर्माण झाला असून ही अफवा आहे की आणखी काय याचा तपास आता केला जाणार आहे.
त्या संदर्भात बेळगाव live ने जिल्हा वनखात्याशी संपर्क साधला असता अद्याप अधिकृतरित्या सैन्य दल किंवा कुणीही असा संदेश दिलेला नसला तरीही आम्ही त्याची पडताळणी करण्यासाठी एक पथक किल्ला आवारात पाठवणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
बिबट्या संदर्भात कोणत्याही अफवा पसरल्या जाऊ नये यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने कडक सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही नागरिकांनी या संदर्भातील फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल न करणे हेच आता महत्त्वाचे ठरणार आहे.
पहाटेच्या वेळी किल्ल्याची दोन्ही प्रवेशद्वारे बंद झाल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. या संदर्भात अनेक नागरिकांनी बेळगाव liveला विशेष संपर्क साधला असता बंदोबस्तावरील पहारेकऱ्यांनी संदर्भातील माहिती विचारली. दरम्यान बिबट्या सदृश्य प्राण्याचा वावर आढळल्याने हा पहारा ठेवण्यात आला असून प्रवेशद्वारे बंद करण्यात आली आहेत. मॉर्निंग वॉकर्स नाही या परिसरात निर्बंध घालण्यात आले आहेत .अशी माहिती देण्यात आली.
दरम्यान काही पहारेकरांनी वरिष्ठ अधिकारी येणार आहेत त्यामुळे हा पहारा आहे असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला आहे. बिबट्या संदर्भातील धास्ती वाढवून नको ते प्रकार घडू नये याची काळजी घेतली जात असल्याचे यावरून स्पष्ट होत असून वनविभागाचे पथक जोपर्यंत अधिकृत माहिती देत नाही तोपर्यंत कोणत्याही अफवांना चालना देऊ नका असे आवाहन करण्यात येत आहे.