एकात्मतेचे दर्शन घडविताना युवा पिढीला उज्वल आणि सक्षम भवितव्याची सदिच्छा देण्यासाठी नागरिक प्रचंड संख्येने बेळगावात आयोजित दुर्गा माता दौडमध्ये सहभागी होतात. दरवर्षी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानतर्फे ही दौड आयोजित केली जाते.
नवरात्रोत्सवाचा एक भाग असणाऱ्या दुर्गामाता दौडमध्ये अबाल वृद्धांसह समाजाच्या सर्व थरातील नागरिकांचा सहभाग असतो. एकात्मतेचा संदेश देण्याबरोबरच नशाबाजीसह समाजातील घातक प्रवृत्तीपासून युवा पिढीने दूर राहावे या एकमेव उद्देशाने प्रत्येक जण दौडमध्ये सहभागी होत असतो. तरुणांवर देव, देश व धर्म यांचे संस्कार बिंबवणे हा देखील दुर्गा माता दौडचा प्रमुख उद्देश असून जो तडीस नेण्याचे कार्य शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान करत आहे. व्यसनाच्या आहारी गेलेल्या पिढीवर चांगले संस्कार व्हावे त्यासाठी शहराच्या प्रत्येक भागातून दररोज सकाळी दुर्गामाता दौड काढली जाते. हजारो धारकरी दुर्गामाता दोडमध्ये सहभागी होऊन आपल्यातील जाज्वल्य राष्ट्रभक्तीचे दर्शन घडवितात.
शहरात काल सोमवारपासून दुर्गामाता दौडला सुरूवात झाली. शिवाजी उद्यान येथून सुरू झालेली दौड त्यानंतर हुलबत्ते कॉलनी, महात्मा फुले रोड, एसपीएम रोड, संत सेना रोड, पाटीदार भवन रोड, शास्त्रीनगर, गुडशेड रोड, कपिलेश्वर कॉलनी, शास्त्रीनगर आठल्ये रोड, महाद्वार रोड चौथा क्रॉस, माणिकबाग रोड, समर्थनगर, महाद्वार रोड तिसरा व दुसरा क्रॉस, संभाजी गल्ली, एसपीएम रोड मार्गे कपिलेश्वर मंदिराच्या ठिकाणी समाप्त झाली. आज दुसऱ्या दिवशी मंगळवार दि. 27 सप्टेंबर रोजी शिवाजी कॉलनी टिळकवाडी येथून दौडला प्रारंभ झाला. त्यानंतर एम. जी. रोड, महर्षी रोड, नेहरू रोड, पहिले रेल्वे गेट, शुक्रवार पेठ, गुरुवार पेठ, देशमुख रोड, मंगळवार पेठ, गोवा वेस स्विमिंग पूल, सोमवार पेठ, देशमुख रोड, आरपीडी क्रॉस, खानापूर रोड, अनगोळ क्रॉस, अनगोळ रोड हरी मंदिर, चिदंबरनगर, हादुगिरी, विद्यानगर, एस. व्ही. रोड, कुरबर गल्ली, धर्मवीर संभाजी चौक, रघुनाथ पेठ, भांदुर गल्ली, सुभाष गल्ली, हणमन्नावर गल्ली, मारुती गल्ली, लोहार गल्ली, नाथ पै नगर, बाबले गल्ली, रघुनाथ पेठ, कलमेश्वर गल्ली मार्गे महालक्ष्मी मंदिर अनगोळ येथे दौडची सांगता झाली.
श्री दुर्गामाता दौडची उद्या बुधवार दि. 28 सप्टेंबर पासूनची कार्यक्रम पत्रिका पुढीलप्रमाणे आहे. बुधवार 28 सप्टेंबर : श्री गणेश मंदिर चन्नम्मा सर्कल ते श्री दुर्गा माता मंदिर किल्ला. श्री गणेश मंदिर चन्नम्मा सर्कल येथून काकती वेस रोड, खडक गल्ली, कोर्ट, चव्हाट गल्ली, पी. बी. रोड, आरटीओ सर्कल, शिवाजीनगर, फोर्ट रोड, गांधीनगर पुन्हा परत श्री दुर्गा माता मंदिर किल्ला.
गुरुवार 29 सप्टेंबर : श्री बसवण्णा मंदिर नेहरूनगर ते ज्योतिबा मंदिर शिवबसवनगर. श्री बसवण्णा मंदिर येथून सदाशिवनगर फर्स्ट मेन सेकंड क्रॉस, सदाशिवनगर सेकंड मेन चौथा क्रॉस, हरिद्रा गणेश मंदिर रोड, आंबेडकर नगर, गणेश चौक, मरगाई मंदिर, सदाशिवनगर फर्स्ट मेन चौथा क्रॉस, तिसरा क्रॉस, दुसरा क्रॉस, नेहरूनगर तिसरा क्रॉस, रामदेव हॉटेल, गॅंगवाडी, दुर्गामाता रोड, रामनगर अशोकनगर, सुभाषनगर, ज्योतिबा मंदिर मार्गे शिवबसवनगर.
शुक्रवार 30 सप्टेंबर : श्री दुर्गा माता मंदिर बसवेश्वर सर्कल खासबाग ते श्री मंगाई मंदिर वडगाव. श्री दुर्गा माता मंदिर खासबाग येथून भारतनगर फर्स्ट क्रॉस, नाथ पै सर्कल, डबल रोड, बसवेश्वर सर्कल, बाजार गल्ली, मरगम्मा मंदिर रोड, भारतनगर (हमाल गल्ली), भारत नगर पाचवा क्रॉस, चौथा क्रॉस, रयत गल्ली, ढोर वाडा, सपार गल्ली, दत्त गल्ली, सोनार गल्ली, वडगाव मेन रोड, बाजार गल्ली, मारुती मंदिर, तेंगिन गल्ली, जुने बेळगाव रोड, गणेश पेठ गल्ली, कुलकर्णी गल्ली, कोरवी गल्ली, संभाजी गल्ली, लक्ष्मी मंदिर लक्ष्मी गल्ली, बस्ती गल्ली, खन्नूरकर गल्ली, चावडी गल्ली, रामदेव गल्ली, येळ्ळूर रोड, नाझर कॅम्प तिसरा क्रॉस, हरिजन वाडा, हरी मंदिर, विठ्ठल मंदिर, वझे गल्ली, धामणे रोड, विष्णू गल्ली, कारभार गल्ली, आनंदनगर, पाटील गल्ली, संभाजीनगर मार्गे पाटील गल्ली मंगल मंदिर.
शनिवार 1 ऑक्टोबर : धर्मवीर संभाजी चौक ते श्री मारुती मंदिर संयुक्त महाराष्ट्र चौक. किर्लोस्कर रोड येथून रामलिंग खिंड गल्ली, अशोक चौक, बसवान गल्ली लक्ष्मी मंदिर, नरगुंदकर भावे चौक, गणपत गल्ली, कडोलकर गल्ली, बुरुड गल्ली, मेणसे गल्ली, आझाद गल्ली, टेंगिनकेरी गल्ली, भोवी गल्ली, गणपत गल्ली, पांगुळ गल्ली, टेंगिनेकेरी गल्ली, करनाट गल्ली, पी. बी. रोड, मार्केट पोलीस स्टेशन, शेट्टी गल्ली, भडकल गल्ली, कोर्ट कॉर्नर, सरदार ग्राउंड रोड, सन्मान हॉटेल, कॉलेज रोड, यंदे खूट, किर्लोस्कर रोड, कडोलकर गल्ली, बापट गल्ली मार्गे संयुक्त महाराष्ट्र चौक श्री मारुती मंदिर.
रविवार 2 ऑक्टोबर : श्री अंबामाता मंदिर शहापूर ते बसवेश्वर सर्कल गोवावेस. श्री अंबामाता मंदिर येथून नाथ पै सर्कल, लक्ष्मी रोड, कारवारी गल्ली, लक्ष्मी रोड, गणेशपुर गल्ली, नवी गल्ली, डबल रोड, बसवेश्वर सर्कल, बाजार गल्ली, बनशंकरीनगर, मारुती गल्ली, बसवान गल्ली, मरगम्मा गल्ली, वर्धाप्पा गल्ली, उप्पार गल्ली, संभाजी रोड, धारवाड रोड, जोशी मळा, संभाजी रोड, आचार्य गल्ली (जेड्डी), गाडे मार्ग, पवार गल्ली, खडेबाजार, बसवान गल्ली, गाडेमार्ग, सराफ गल्ली, बिच्चू गल्ली, आचार्य गल्ली, विठ्ठलदेव गल्ली, नार्वेकर गल्ली, पी. बी. रोड, होसुर, बसवान गल्ली, बोलमाळ बोळ, खडेबाजार, महात्मा फुले रोड, मिरापूर गल्ली, खडेबाजार, कचेरी गल्ली, हट्टीहळ गल्ली, एम. एफ. रोड, रामलिंग वाडी, आनंदवाडी, वडगाव रोड, अळवण गल्ली, खडेबाजार, मेलगे गल्ली, जेड गल्ली, भोज गल्ली, दाणे गल्ली, खडेबाजार, कोरे गल्ली मार्गे बसवेश्वर सर्कल गोवावेस.
सोमवार 3 ऑक्टोबर : श्री शिवतीर्थ ते धर्मवीर संभाजी चौक (जत्तीमठ). श्री शिवतीर्थ येथून काँग्रेस रोड, ग्लोब टॉकीज रोड, इंडिपेंडेंट रोड, हाय स्ट्रीट, चर्च स्ट्रीट, कल्याणी स्वीट मार्ट रोड, गवळी गल्ली, कोर्ट स्ट्रीट, कोंडाप्पा स्ट्रीट, चर्च स्ट्रीट, मद्रास स्ट्रीट, कुंती माता मंदिर, फिश मार्केट, तेलगू कॉलनी के टी पुजारी दुर्गामाता मंदिर खानापूर रोड मार्गे धर्मवीर संभाजी चौक श्री दुर्गा माता मंदिर जत्तीमठ.
मंगळवार 4 ऑक्टोबर : श्री सोमनाथ मंदिर ताशिलदार गल्ली ते श्री शनी मंदिर. श्री सोमनाथ मंदिर ताशिलदार गल्ली येथून फुलबाग गल्ली, पाटील गल्ली, शनी मंदिर रोड, मठ गल्ली, कलमठ रोड, अनंतशयन गल्ली, टिळक चौक, कोनवाळ गल्ली, अनुपम हॉटेल रोड, कुलकर्णी गल्ली, शेरी गल्ली, शिवाजी रोड, मीनाक्षी हॉटेल क्रॉस, मुजावर गल्ली, कांगली गल्ली, स्टेशन रोड, पाटील गल्ली, फुलबाग गल्ली रोड, ताशिलदार गल्ली, पाटील मळा, भांदूर गल्ली, तानाजी गल्ली 1, महाद्वार रोड, तानाजी गल्ली, समर्थनगर चौथा क्रॉस, पाचवा क्रॉस, महाद्वार रोड, कपिलेश्वर मंदिर कपिलेश्वर ओव्हर ब्रिज मार्गे श्री शनी मंदिर.
बुधवार 5 ऑक्टोबर : श्री मारुती मंदिर मारुती गल्ली ते धर्मवीर संभाजी चौक. श्री मारुती मंदिर मारुती गल्ली येथून नरगुंदकर भावे चौक, श्री महालक्ष्मी मंदिर बसवान गल्ली, देशपांडे गल्ली, बसवण्णा मंदिर, अशोक चौक, रामलिंग खिंड गल्ली, टिळक चौक, रिझ टॉकीज रोड, कोनवाळ गल्ली, अनसुरकर गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, केळकर बाग, समादेवी गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, नार्वेकर गल्ली, शनिवार खुट, काकतीवेस रोड, गणाचारी गल्ली, गवळी गल्ली, गोंधळी गल्ली, कंग्राळ गल्ली, काकती वेस, कंग्राळ गल्ली मागील बोळ, सरदार ग्राउंड कॉलेज रोड (सन्मान हॉटेल), चन्नम्मा सर्कल, काळी आमराई, कॉलेज रोड, गोंधळी गल्ली, समादेवी गल्ली, कॉलेज रोड मार्गे धर्मवीर संभाजी चौक.