सौदत्ती येथील रेणुकादेवी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना निकृष्ट दर्जाच्या सुविधा मिळत आहेत. याचप्रमाणे अपुरी साधनसामुग्री आणि देवस्थान परिसरातील गलथान कारभार याबाबत माजी आमदार व सीएडीए अध्यक्ष विश्वनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप नेते किरण जाधव यांनी जिल्हाधिकारी डॉ. नितेश पाटील यांना निवेदन सादर केले.
बेळगाव जिल्ह्यातील पुरातन रेणुका देवी मंदिराला भेट देण्यासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. असे असूनही याठिकाणी येणाऱ्या भाविकांना योग्य सुविधा उपलब्ध होत नसल्याने भाविकांची मोठी गैरसोय होत आहे.
हि समस्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन येथे सोयीसुविधा पुरवाव्यात असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. नितेश पाटील यांनी निवेदन स्वीकार करून सौंदत्ती येथे येणाऱ्या भाविकांसाठी योग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असे आश्वासन दिले.
यासांदर्भात जिल्हा पोलीस प्रमुख, ताशिलदार आणि इतर अधिकाऱ्यांसमवेत स्वतः पाहणी करून लवकरच येथील परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल, भाविकांना दर्शनासाठी कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही, असा भरवसा त्यांनी दिला.