Friday, December 20, 2024

/

कित्तूर किल्ल्याला जिल्हाधिकाऱ्यांची भेट

 belgaum

कित्तूर संस्थानाचा किल्ला आणि सध्या अस्तित्वात असलेला राजवाडा यांच्या यथास्थिती संरक्षणाबरोबरच पर्यटकांना योग्य माहिती मिळावी या दृष्टिकोनातून योग्य अशी योजना आखण्यात यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केली आहे.

राणी चन्नम्मा यांचा कित्तूर येथील किल्ला आणि राजवाड्याला आज शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी करण्याबरोबरच अधिकाऱ्यांशी चर्चा केली. कित्तूर किल्ल्या शेजारी असणाऱ्या राजवाड्याच्या ठिकाणी आवश्यक जागी माहिती फलक लावले जावेत.

जेणेकरून पर्यटकांना किल्ला आणि राजवाड्याबद्दल उद्बोधक माहिती मिळणे सोयीचे होईल. यासंदर्भात त्वरित कार्यवाही करावी, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांना केली. त्याचप्रमाणे राजवाड्याच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना बाबतही त्यांनी अधिकाऱ्यांची चर्चा केली. कर्मचाऱ्यांकडून किल्ल्यातील परिसर स्वच्छ ठेवला जावा. किल्ल्यात असलेल्या विहिरीतील पाण्यात पडलेला केरकचरा स्वच्छ करून विहीर स्वच्छ ठेवावी, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली.

याप्रसंगी किल्ला आवारातील वस्तू संग्रहालयाचे क्युरेटर राघवेंद्र यांनी कित्तूर किल्ला आणि वस्तुसंग्रहालय संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना अधिक माहिती दिली. Dc kittur fort

किल्ला परिसर आणि राणी चन्नम्मा यांच्या राजवाड्याची पाहणी करताना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी तेथील ध्यानसाधनेची कोठडी, दरबार हॉल, स्वयंपाक घर वगैरेंची माहिती जाणून घेतली.

याप्रसंगी त्यांच्या समवेत जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., कित्तूरचे तहसीलदार सोमलिंगप्पा हलगी यांच्यासह पुरातत्व तसेच संबंधित अन्य खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.