परतीच्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी केले आणि हाता तोंडाशी आलेले पीक देखील गमावण्याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागले. मात्र पाऊस पडताच झालेल्या नुकसानीपेक्षा आता पिकांची काढणी करत असताना घटत असलेले उत्पादनnयामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्या हलगा भागात सोयाबीन काढणी चालू असून परतीच्या पावसामुळे सोयाबीन जमिनदोस्त झाले आहे. परिणामी पेरलेले सोयाबीन देखील मिळणे कठीण बनले आहे.
शेतकऱ्यांना शेती व्यवसाय करत असताना प्रामुख्याने पावसावरच अवलंबून राहावे लागते.बळीराजा नेहमी पावसाची आतुरतेने वाट पाहतो मात्र यंदा झालेला परतीचा पाऊस शेतकऱ्यांच्या पिकांची पुरती वाट लावून गेला असून परिणामी सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे.पेरलेले सोयाबीन देखील मिळणार नसल्याचे मत शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
साधारण शेतामध्ये आपल्या शेतीक्षेत्रा नुसार अनेकांनी 35 ते 50 किलो असे सोयाबीन पेरले आहे.मात्र झालेला जोरदार पाऊस आणि परिणामी पडलेले सोयाबीन पिक यामुळे सोयाबीनचे उत्पादन घटनार असून पेरलेले धान्य देखील मिळणार नसल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
सोयाबीनचे बी शंभर रुपये किलो दराने घेऊन पेरण्यात आले होते शिवाय सोयाबीन पीक येण्यासाठी त्याच्यात कसलेले शेतकऱ्यांचे श्रम तसेच भांगलने,ट्रॅक्टरच्या सहाय्याने केलेले श्रम आणि यासाठी द्यावे लागलेले पैसे याचा ताळमेळ साधताना यंदाचे पीक बुडीत खात्यात असल्याचे मत शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
परतीच्या पावसाने रताळी,बटाटे यांचे देखील मोठे नुकसान झाले असून सध्या सुरू असलेल्या रताळे व बटाटे काढणी मध्ये देखील पावसामुळे शेतात झालेली ओल अडचणीची ठरवू लागली आहे . यंदा भाताला सदर पाऊस पोषक ठरला असला तरीही इतर पिकांसाठी मात्र या पावसाचा धोका निर्माण झाला आहे.परिणामी सध्या ऊन पडले असल्याने काढणी ला वेग आला असता उत्पादन घटल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.