Friday, January 31, 2025

/

धर्मापलीकडची माणुसकी जपत पार पाडले अंत्यसंस्कार!

 belgaum

‘माणुसकी हाच खरा धर्म’ या उक्तीप्रमाणे बेळगावमध्ये मुस्लिम नेत्यांनी एका हिंदू मुलीवर अंत्यसंस्कार करून माणुसकीचे दर्शन घडविले आहे.

नगरसेवक बाबाजान मतवाले, रियाज किल्लेदार, इम्रान पारखान, शाहिद पठाण, सलमान मंगलकट्टी आणि तट्टे इडलीचे संचालक शांतकुमार आदींच्या पुढाकारातून एका हिंदू धर्मातील मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

बाल्कनीतून फुले काढताना तोल जाऊन पडलेल्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना वीरभद्र नगर येथे घडली आहे. वीरभद्रनगर येथील विद्याश्री हेगडे असे मृत मुलीचे नाव असून उडुपी जिल्ह्यातील या मुलीचे वडील कुटुंबासह अनेक वर्षांपूर्वी बेळगावमध्ये स्थायिक झाले.

 belgaum

गुरुवारी विद्याश्री इमारतीसमोर फुले काढण्यासाठी गेली असता तोल जाऊन पहिल्या मजल्यावरून ती जमिनीवर पडली.जखमी अवस्थेतील विद्याश्रीला स्थानिक मुस्लिम नेत्यांनी खासगी रुग्णालयात दाखल केले.Corporatoe matwale

उपचाराचा खर्चही दिला. मात्र उपचाराचा उपयोग न होत्या मुलीचा मृत्यू झाला. दरम्यान मुस्लिम नेत्यांनी स्वतः पुढाकार घेऊन अंत्यसंस्काराची तयारी केली. सदाशिव नगर येथील लिंगायत स्मशानभूमीत लिंगायत विधीनुसार सदर मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान मुस्लिम समाजातील नेत्यांनी केलेल्या या मानवतावादी कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून धर्मापेक्षाही माणुसकीचे नाते जपल्याची चर्चा सुरु आहे.

नगरसेवक बाबाजान मतवाले, रियाज किल्लेदार, इम्रान पारखान, शाहिद पठाण, सलमान मंगलकट्टी आणि तट्टे इडलीचे संचालक शांतकुमार यांनी केलेले कार्य हे खरोखरच कौतुकास्पद असून प्रत्येकासाठी अनुकरणीय असे आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.