सोशल मीडियावरील प्रत्येक चुकीच्या आणि प्रक्षोभक पोस्टवर आमचे लक्ष आहे. तेंव्हा सोशल मीडियावर एखादी पोस्ट टाकताना किंवा शेअर करताना दोनदा विचार करा, अन्यथा तुम्हाला शहराची शांतता भंग करण्यास जबाबदार धरले जाईल, असा इशारा पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी ट्विटच्या माध्यमातून दिला आहे.
सोशल मीडियावरील प्रत्येक चुकीच्या आणि प्रक्षेपक पोस्टवर आमचे लक्ष आहे तेव्हा सोशल मीडियावर एखादी पोस्ट टाकताना किंवा शेअर करताना दोनदा विचार करा काही मंडळी अफवा आणि प्रक्षोभक संदेश पसरवत आहेत.
तेव्हा आमची नागरिकांना विनंती आहे की अशा पोस्ट आणि संदेशांकडे लक्ष देऊ नये अन्यथा तुमच्या पोस्ट किंवा कमेंट मुळे तुम्हाला शहराची शांतता भंग करण्यास जबाबदार ठरले जाईल, असा तपशील पोलीस आयुक्तांच्या ट्विटमध्ये नमूद आहे.
आपल्या ट्विट समवेत पोलीस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या यांनी बेळगाव शहर पोलिसांचा संदेश शेअर केला आहे. सोशल मीडियावर बेळगाव शहर पोलीस बारीक लक्ष ठेवून आहेत. तेंव्हा सार्वजनिक आणि सोशल मीडियावर शांततेसह कायदा व सुव्यवस्थेला धक्का लागेल
असे पोस्ट, ट्विट, कमेंट वगैरे टाकण्यापूर्वी किंवा शेअर करण्यापूर्वी विचार करावा. तशी चूक केल्यास ते शिक्षेस पात्र ठरतील, असा संदेश बेळगाव शहर पोलिसांनी दिला आहे.