कॅम्प येथील रहिवाशी असलेल्या युवकांवर चाकूने हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री घडली आहे अनंतशयन गल्ली जवळ झालेल्या या हल्ल्यात सदर युवक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अंबा भुवन परिसरातून तिघे युवक दुचाकीवरून जात होते त्या युवकांना दहा जणांच्या गटाने अडवून चाकूने हल्ला केला व फरारी झाले. फरहान धारवाडकर वय 15 रा.कॅम्प असे या घटनेत जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.
या घटनेत फरहान सोबत दुचाकीवर असणारे दोघे युवकांनी पलायन करून कॅम्प मधील आपले घर गाठले आहे.सुमारे दहा ते पंधरा जणांच्या युवकांच्या गटाने फरहान व अन्य दोघांना अनंतशयन गल्ली जवळ अडवले त्यावेळी अन्य दोघांनी पळ काढला अन ते वाचले तर फरहान एकटा त्या युवकांच्या तावडीत सापडला त्यावेळी युवकांच्या गटाने फरहान वर हल्ला करण्यात आला.
चाकू हल्ल्या मागचे कारण अध्याप समोर आलं नाही घटनेत जखमी युवकावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेऊन घटनेची माहिती घेतली चाकू हल्ल्यात जखमी झालेला फरहान हा इस्लामिया शाळेत दहावीत शिकत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
शहराचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही जिल्हा रुग्णालयाला भेट देत माहिती घेतली आहे.