Friday, January 10, 2025

/

‘एकतायुवक मंडळाचा उपक्रम’ भव्य शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन

 belgaum

बेळगाव जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या सहकार्याने कांगली गल्ली बेळगाव येथील एकता युवक मंडळ नवरात्रोत्सवतर्फे येत्या गुरुवार दि. 1 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी 4 वा. सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण तोपिनकट्टी पुरस्कृत मोरया क्लासिक -2022, मोरया श्री -2022 आणि ज्यु. मिस्टर बेळगाव -2022 या भव्य शरीर सौष्ठव स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

शहरातील श्री शनी मंदिरनजीकच्या हेमू कलानी चौक येथे या शरीर सौष्ठव स्पर्धा होणार आहेत. मोरया क्लासिक -2022 किताबाची स्पर्धा 60, 65, 70, 75 किलो आणि 75 किलो वरील गट अशा पाच वजनी गटात घेतली जाणार आहे. ही स्पर्धा सर्व शरीरसौष्ठवपटूंसाठी खुली आहे. स्पर्धेच्या प्रत्येक गटातील पहिल्या पाच क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे 2500 रु., 2000, 1500, 1000 आणि 1000 रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाणार असून बेस्ट पोझरसाठी 2000 रुपयांचे बक्षीस दिले जाईल. मोरया क्लासिक -2022 किताब विजेत्यास रोख 5000 रुपये, मेडल आणि प्रशस्तीपत्र प्रदान केले जाईल. स्पर्धेचे प्रवेश शुल्क 100 रुपये असणार असून स्पर्धकांची रात्रीची जेवणाची व्यवस्था संयोजकांतर्फे केली जाणार आहे.

ज्यू. मिस्टर बेळगाव -2022 किताबाची स्पर्धा बेळगाव जिल्हा मर्यादित 21 वर्षाखालील शरीरसौष्ठवपटूंसाठी असणार आहे. या स्पर्धेतील पहिल्या टाॅप -10 स्पर्धकांपैकी पहिल्या पाच क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे 3000, 2000, 1500, 1000 व 1000 रुपयांचे रोख पारितोषिक तर उर्वरित पाच विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू दिल्या जातील.Body building competation

या स्पर्धेत सरकारी कर्मचाऱ्यांना भाग घेता येणार नाही. स्पर्धकांनी स्पर्धेसाठी स्वतःचे सोबत एसएसएलसी सर्टिफिकेट, आधार कार्ड अथवा लायसन्स सादर करणे आवश्यक आहे.

मोरया श्री -2022 ही जिम्नॅशियम अर्थात व्यायाम शाळा पातळीवर मर्यादित शरीरसौष्ठव स्पर्धा असणार आहे. या स्पर्धेतील पहिल्या 10 क्रमांकाच्या विजेत्यांना आकर्षक करंडक, मेडल्स व प्रशस्तीपत्रके बक्षीसा दाखल दिली जातील. तरी सदर स्पर्धांमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्या शरीरसौष्ठवपटूंनी अधिक माहितीसाठी अजित सिद्दन्नावर (9844073043), गौरांग गेंजी (7411727088), सुनील राऊत (9620407700) अथवा सतीश कांबळे (7795668692) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.