मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणपती उत्सव मंडळ झेंडा चौक, मार्केट -बेळगाव यांच्यातर्फे श्री गणेशोत्सवानिमित्त उद्या शुक्रवार दि. 2 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी 4 वाजता जिल्हा पातळीवरील 18 व्या श्री गणेश -2022 शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
बेळगाव जिल्हा शरीर सौष्ठव संघटनेच्या सहकार्याने भाग्यनगर पहिला क्रॉस टिळकवाडी येथील रामनाथ मंगल कार्यालय येथे ही स्पर्धा आयोजित केली आहे. सदर शरीर सौष्ठव स्पर्धा भारतीय शरीर सौष्ठव महासंघाच्या नियमानुसार 55 किलो, 60 किलो, 65 किलो, 70 किलो, 75 किलो, 80 किलो आणि 80 किलो वरील गट अशा विविध सात गटात घेतली जाईल.
स्पर्धेतील श्री गणेश -2022 टायटल विजेत्या शरीरसोपटूला 11000 रुपये, पदक, प्रमाणपत्र आणि कै. शंकरराव फकीरप्पा मोरे यांच्या स्मरणार्थ फिरता करंडक बक्षीसा दाखल दिला जाईल. याखेरीज स्पर्धेतील प्रत्येक गटातील पहिल्या पाच क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे 5000, 4000, 3000, 2000 व 2000 रुपये अशी रोख पारितोषिके तसेच ‘बेस्ट पोझर- किताब विजेत्यास रोख 3000 रुपयांचे बक्षीस दिले जाईल.
स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सतीश जारकीहोळी, उद्योजक शिरीष गोगटे, दर्शन ग्राफिक्सचे श्रीकांत देसाई, व्यावसायिक सुहास शिरोडकर, चित्रपट प्रदर्शक अविनाश पोतदार, रोटरी क्लबचे शरद पै आणि बसवराज विभूती उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेच्या ठिकाणी शरीरसष्टोपटूंचे वजन उद्या स्पर्धेला प्रारंभ होण्यापूर्वी दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंतच्या कालावधीत तपासले जाईल.
तरी सदर स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या शरीर सौष्ठवपटूंनी अधिक माहितीसाठी अजित सिद्धण्णावर (9844063043), सुनील राऊत (9620407700), गणेश मंडळाचे अध्यक्ष अमित किल्लेकर अथवा सेक्रेटरी राजू हंगेरगेकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.