Wednesday, November 20, 2024

/

मराठा सेंटर येथे 6, 7 रोजी डीएससी भरती मेळावा

 belgaum

मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगाव तर्फे येत्या गुरुवार दि. 6 व शुक्रवार दि. 7 ऑक्टोबर 2022 रोजी माजी सैनिक व टीए पर्सनल करिता सोल्जर जनरल ड्युटी व सोल्जर क्लार्क या पदांसाठी डीएससी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर भरती मेळाव्यासाठी पात्रता निकष पुढीलप्रमाणे आहेत. उमेदवाराने एमएलआयआरसीमध्ये सेवा केलेली असावी. सेवेतून मुक्त होताना ‘आदर्शवत’ अथवा “अत्युत्तम’ हा शेरा मिळालेला असावा. लष्कराच्या मागील संपूर्ण सेवेदरम्यान दोन पेक्षा जास्त वेळा लाल शाईचा शेरा मिळालेला नसावा. सेवेत असताना लष्करी कायदा कलम 34, 35, 36, 37 व 41 (2) अन्वये शिक्षा झालेले नसावी.

गेल्या 5 वर्षात लष्करी कायदा कलम 48 अन्वये गार्ड व ड्युटीमध्ये लाल किंवा काळ्या शाईत शिक्षा झालेली नसावी. मागील सेवेच्या शेवटच्या 3 वर्षात लाल शाईचा शेरा मिळालेला नसावा. लष्करातील पुनर्रप्रवेश निवृत्तीच्या दिवसापासून 2 वर्षाच्या आतील असावा. मागील सेवेतून उमेदवार एक तर संपूर्ण सेवाकाळ पूर्ण करून अथवा भरतीच्या अटी किंवा स्व विनंतीवरून सेवानिवृत्त झालेला असावा उमेदवाराची शैक्षणिक पात्रता मॅट्रिक आणि त्यावरील परीक्षा उत्तीर्ण अथवा एसीईlll साठी नॉन मॅट्रिक असावी.

सोल्जर जनरल ड्युटी पदासाठी उमेदवाराचे वय 46 वर्षाखालील आणि सोल्जर क्लार्क पदासाठी 48 वर्षाखालील असले पाहिजे. ओरिजनल डिस्चार्ज बुक, सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे, अधिकृत सरकारी सहीचे जात प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, स्वच्छ चारित्र्याचे प्रमाण देणारे गाव सरपंच आणि पोलीस पाटलाची सही शिक्का असणारे कॅरेक्टर सर्टिफिकेट (हे सर्टिफिकेट अदा केल्यापासून सहा महिने वैध असेल),

कॅरेक्टर सर्टिफिकेट सोबत कुटुंबातील सर्व सदस्यांची फोटोसह नांव व नाते स्पष्ट करणारी माहिती, आर्मी ग्रुप इन्शुरन्स सर्टिफिकेट, ओरिजनल सर्टिफिकेटच्या फोटो स्टेट कॉपींचे दोन संच, उमेदवाराच्या नुकत्याच काढलेल्या फोटोच्या 15 कॉपी, जिल्हा पोलीस प्रमुखांचे अधिकृत पडताळणी प्रमाणपत्र

आणि पीपीओ या गोष्टी उमेदवारांनी भरतीसाठी येताना स्वतः सोबत आणणे आवश्यक आहे. भरती मेळाव्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी येत्या गुरुवार दि. 6 ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक 7 वाजता मराठा सेंटर बेळगाव येथे हजर रहावे, असे आवाहन एमएलआयआरसी बेळगावच्या एडज्युटंटनी केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.