Saturday, December 28, 2024

/

बेळगावच्या चक दे गर्ल्स दसरा स्पोर्ट्ससाठी

 belgaum

विभागीय दसरा हॉकी स्पर्धेचे अजिंक्यपद पटकविणाऱ्या बेळगावच्या मुलींच्या हॉकी संघाची म्हैसूर येथे उद्या बुधवार दि. 28 सप्टेंबरपासून सोमवार दि. 3 ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या राज्य पातळीवरील म्हैसूर दसरा क्रीडा महोत्सवासाठी निवड झाली असून उद्या हा संघ म्हैसूरला रवाना होणार आहे.

म्हैसूर दसरा क्रीडा महोत्सवातील राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या बेळगावच्या संघामध्ये शांतला पवार (गोगटे कॉलेज), सारा शिंदे (गोगटे कॉलेज), मृणाली भाटे (आरपीडी कॉलेज), धनश्री शिंदे (गोगटे कॉलेज), भावना किलारगी (गोगटे कॉलेज), अश्विनी रविदास (आर. एल. लाॅ कॉलेज), पूजा बाळेकुंद्री (गोगटे कॉलेज), इशा गवळी (जीएसएस कॉलेज), मानसी पाटील (गोगटे कॉलेज), वैष्णवी मालवणकर (गोगटे कॉलेज), प्राजक्ता एन. (गोगटे कॉलेज), सौंदर्या जिरली (गोगटे कॉलेज) आणि श्रेया एच. (गोगटे कॉलेज) यांचा समावेश आहे. हा संघ उद्या बुधवारी पहाटे 5 वाजता रेल्वेने म्हैसूरच्या दिशेने प्रयाण करणारा आहे. संघासमवेत प्रशिक्षक म्हणून ज्येष्ठ हॉकीपटू माजी सैनिक सुधाकर चाळके, उत्तम शिंदे व महिला प्रशिक्षक रवाना होणार आहेत.

बेळगावच्या उपरोक्त मुलींच्या संघाने सहा जिल्ह्यांचा सहभाग असलेल्या दसरा विभागीय हॉकी स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले आहे. सदर स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात गदग संघाला 5 -0 अशा गोल फरकाने पराभूत केले. त्यानंतर डीवायईएस (धारवाड) संघावर पेनल्टी स्ट्रोकवर 3 -0 अशी मात करून अंतिम सामन्यात प्रवेश मिळविला. अंतिम सामन्यात बेळगाव संघाने प्रतिस्पर्धी बागलकोट संघावर 4 -0 अशा गोल फरकाने एकतर्फी विजय मिळविला. परिणामी बेळगाव संघाची म्हैसूर येथील राज्यस्तरीय दसरा हॉकी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.Hocky

सदर यशाबद्दल बेळगावच्या या मुलींच्या हॉकी संघाचे फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर यांच्यासह डाॅ. समीर शेख, अमर कोल्हापुरे, डॉ आनंद तोट्टगी, किरण निप्पाणीकर, मंदार कोल्हापुरे, मुदस्सर तेरणीकर, शिवप्रसाद जोशी, वरूण कारखानीस, अवधूत तुडवेकर आणि स्वामी समर्थ भक्त परिवाराने खास अभिनंदन केले आहे.

तसेच फेसबुक फ्रेंड्स सर्कलने बेळगाव संघातील खेळाडूंच्या जाण्या -येण्याचा रेल्वे तिकिटांचा खर्च उचलला आहे हे विशेष होय. त्यासाठी 10 हजार रुपये संघ व्यवस्थापकांकडे सुपूर्द केले जाणार आहेत. राज्यस्तरीय स्पर्धेतील निवडीबद्दल बेळगावच्या महिला हॉकी संघातील उपरोक्त खेळाडू व प्रशिक्षकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.