एआयएमआयएम(AIMIM)चे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिष्टर असददुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव जिल्ह्यात पक्ष संघटना बळकट करत आहोत आगामी दिवसांत ग्राम पंचायतीपासून लोकसभा निवडणुकी पर्यंत कोणीतही निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहोत असे मत एमआयएमचे राज्य मुख्य कार्यदर्शी माजी नगरसेवक लतीफखान पठाण यांनी व्यक्त केले आहे.
बेळगावात शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.आगामी काळात बेळगावात होणाऱ्या निवडणुकांसाठी सज्ज रहा असा आदेश ओवेसी यांनी आम्हाला दिला असून बेळगावातील पक्षाची नूतन कार्यकारिणी त्यादृष्टीने काम करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
एआयएमआयएम या पक्षाच्या बेळगाव जिल्ह्याच्या अध्यक्षपदी मसूद आलम सनदी यांची नियुक्ती करण्याचे आदेश एआयएमआयएम चे राष्ट्रीय अध्यक्ष असददुद्दीन ओवेसी यांनी बजावला आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे.
ते पुढे म्हणाले एआयएमआयएमच्या बेळगाव जिल्हाध्यक्ष पदी या अगोदर मीच होतो मात्र माझी राज्य सरचिटणीस पदी नियुक्ती झाल्याने हे पद रिक्त होते त्यामुळे पक्षाध्यक्षानी मसूद आलम सनदी यांना अध्यक्ष करण्याचे आदेश दिले आहेत.
बेळगाव शहर अध्यक्षपदी मोहम्मद जैन डोनी यांची नियुक्ती झाली आहे तर बेळगाव हा राज्यातील विस्ताराने मोठा जिल्हा असल्याने चिकोडी संसदीय अशी 7 सदस्यीय कमिटी देखील बनवण्यात आली असून त्याचे प्रभारी पद झाकीर हुसेन खादरी यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.