बिबट्याच्या आपत्कालीन सुट्टीनंतर शाळा सुरू झाली.आपला अभ्यासक्रम कसा पूर्ण करावा? विद्यार्थ्यांना परत शिक्षणाच्या प्रवाहात कसे आणावे? विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी निर्माण करण्यासाठी काय करावे?असे अनेक प्रश्न मनात निर्माण होत असताना बेळगाव येथील मराठी विद्यानिकेतनच्या शिक्षकांनी विचारपूर्वक नियोजन केले… आणि अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. असाच एक यशस्वी प्रयत्न म्हणजे ‘आहाराची विविधता’हे वर्ग प्रदर्शन.
इयत्ता पहिली आणि दुसरी च्या सर्व विद्यार्थ्यांनी आणि ताईंनी मिळून उत्कृष्ट असे वर्ग प्रदर्शन मांडले. पहिली आणि दुसरीच्या अभ्यासक्रमावर आधारित वर्ग प्रदर्शनाची मांडणी केली आणि ‘आहार’हा पाठ प्रदर्शनातून समजावून दिला.
तसेच दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी,सहावी या इयत्तांना उपयोगी पडेल अशा वर्ग प्रदर्शनाची मांडणी केली.पोटासाठी खा, जिभेसाठी नाही” हा मोलाचा सल्ला यातून दिला. इयत्ता पहिलीपासून सहावी पर्यंतच्या मुलांनी ‘आहाराची विविधता’ हा पाठ या प्रदर्शनातून समजावून घेतला.
इयत्ता पहिलीच्या वर्ग प्रदर्शनाचे उद्घाटन शिक्षण संयोजिका निलूताई यांनी केले. तर इयत्ता दुसरीच्या वर्ग प्रदर्शनाचे उद्घाटन प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक जी.व्ही. सावंत सर यांनी केले. उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी शरीरातील आहाराचे महत्व, आहाराची गरज, सध्याची चुकीची आहार पद्धती… आणि त्याचा आपल्या शरीरावर होणारा वाईट परिणाम.या सर्व गोष्टींविषयी चर्चा केली. मुलांना आहाराचे महत्त्व पटवून दिले.
माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक .आय. व्ही. मोरे , प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक जी.व्ही.सावंत सर शिक्षण संयोजिका निलुताई, जेष्ठ शिक्षक शिंदे सर,प्रसाद सावंत ,एन्.सी.उडकेकर ,मुतकेकर उपस्थित होते. पहिलीच्या वर्गताई -कमल, नम्रता,दीप्ती तर दुसरीच्या वर्गताई शैला मुक्ताताई, उषा यांनी हा पोषण आहार सप्ताह संपन्न करण्यासाठी आपले योगदान दिले.