अपघात होऊन मयत झालेल्याच दिवशीचं जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी कुटुंबाला लाखांची शासकीय मदत पोचवत पुन्हा एकदा कार्यतत्परता दाखवली आहे.
आरटीओ सर्कलजवळ मोठ झाड पडून जागीच मृत्यू झालेल्या तरुणाच्या वारसांना तातडीने पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई पोचवली आहे.
मंगळवारी सकाळी राकेश लगमप्पा सुलधाळ (27, रा. सिद्दनहल्ली, तुम्मुरगुड्डी गाव, बेळगाव) शहरातील मराठा मंडळ शाळेजवळ दुचाकीवरून जात असताना पाऊस व वाऱ्यामुळे मोठे झाड कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला होता.घटना घडलेल्या केवळ काही तासांत नितेश पाटील यांनी मदत पोचवली आहे.
बीम्स कडून शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर, बेळगाव तहसीलदार कार्यालयातून पाच लाख रुपये नुकसानभरपाईची रक्कम तात्काळ मृत तरुणाची आई हलव्वा लगामप्पा सुलधाळ यांच्या अॅक्सिस बँक खात्यात जमा करत डीसींनी मृत तरुण राकेश याच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला आहे.
याअगोदर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी पावसाने घर कोसळलेल्याना त्याच दिवशी मदत पोचवली होती आता झाड कोसळलेल्या युवकांच्या कुटुंबियांना मदत देत पुन्हा एकदा कार्य तत्परता दाखवली आहे.