हलगा (ता बेळगाव) गावातील बस्तीजवळ हालगा -तारीहाळ भररस्त्यावर एका मोटरसायकल स्वाराचा अज्ञातांनी मानेवर प्राणघातक धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केल्याची खळबळ जनक घटना आज सायंकाळी 4:30 -4:45 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
अज्ञातांनी धारदार शस्त्राने वार करून ठार केलेल्या मोटरसायकल स्वाराचे नाव गदगय्या हिरेमठ वय 40 रा. शिंदोळी असे नाव आहे.
खुनाच्या या प्रकाराची माहिती मिळताच हिरे बागेवाडी पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले आहेत. ठार झालेला इसम हा आपल्या मोटरसायकलवरून आज शुक्रवारी तारीहाळहून बेळगावच्या दिशेने निघाला होता.
त्यावेळी हालगा गावच्या बस्ती जवळ सायंकाळी 4:30 -4:45 वाजण्याच्या सुमारास भररस्त्यात अज्ञातांनी त्याच्या मानेवर प्राणघातक वार केला. ज्यामुळे मान तुटून संबंधित मोटरसायकल स्वार जागीच आपल्या मोटरसायकलवरच रक्ताच्या थारोळ्यात कोसळून गतप्राण झाला.
सदर प्रकारामुळे हालगा -तारीहाळ रस्त्यावरील संबंधित परिसरात एकच खळबळ उडवून घबराट निर्माण झाली होती. हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय शिंनूर घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्याबरोबरच खून का केला कुणी केला याचा तपास सुरू आहे.