बेळगाव सिटी ॲन्ड तालुका फोटोग्राफर-व्हिडिओग्राफर असोसिएशनतर्फे गुरुवारी (ता. १८) जागतिक फोटोग्राफर दिनानिमित्त शानभाग हॉलमध्ये (बिस्कीट महादेव मंदिर) येथे रक्तदान शिबिर,आरोग्य तपासणी शिबीर, फोटोग्राफी वर आधारित व्याख्यान व प्रदर्शन भरवण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्योजक आर. एम. चौगुले यांच्या हस्ते फीत कापून स्टॉलचे उद्गाटन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष डी. बी. पाटील, डॉ. निता देशपांडे, उमेश रामगुरवाडी, अजित शानभाग, सुभाष ओऊळकर, विनोद कट्टी, बाबा रामन्नावर, उपाध्यक्ष संतोष पाटील, सचिव संजय हिशोबकर आदी उपस्थित होते. मीनी एक्स्पोचे उद्घघाटन क्लिक करून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संघटना व रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम यांच्यावतीने रक्तदान शिबिर झाले. यावेळी एकूण ४० जणांनी भाग घेतला.
यावेळी डॉ. निता देशपांडे व के. एच. बेलगामकर फाउंडेशनतर्फे आरोग्य तपासणी शिबीरही झाले. बीपी व शुगर तपासणी करण्यात आली. यावेळी सुमारे १२५ जणांची तपासणी करण्यात आली. सुभाष ओऊळकर, बाबा रामण्णावर व विनोद कट्टी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी फोटोग्राफीचे एकूण १३ स्टॉल मांडण्यात आले होते.
यावेळी अमित पवार यांनी अत्याधुनिक कॅमेरा टेक्नॉलॉजीवर मार्गदर्शन केले. डॉ. निता देशपांडे, यांनी छायाचित्रकारांनी आरोग्याची काळजी घ्यावी. फोटोग्राफरची खुप धावफळ होते. वेळेवर आहार घेतला पाहिजे. समाजासमोर वेगवेगळी छायाचित्र फोटोग्राफर घेऊन येतो. यातून बरीचशी माहिती आपल्याला कळते असे सांगितले. डी. बी. पाटील म्हणाले, आपल्या संघटनेत एकता आहे. असेच आपण कार्य यानंतरही केले पाहिजेत. आपण संघटनेला पुढे घेऊन जाऊया असे आवाहन केले.
यावेळी नितीन महाले, दिपक वांद्रे, धोंडीबा दिवटे, बापु सांगुकर, सचीन गोवेकर, संतोष बाचीकर, सुरेश मुरकुंबी, राम परदेशी,विनायक कोकीतकर,आनंद पाटील आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन संदीप मुतगेकर, भरमा मोटरे यांनी केले. नामदेव कोलेकर यांनी आभार मानले.