हिंदू, मुस्लिम,सिख, ईसाई हम है भाई भाई असे म्हटले जाते विविधतेतून एकता सांगणारी आपली भारतीय संस्कृती आहे आणि भारतीय संस्कृती जपण्याचं महत्त्वपूर्ण कार्यशाळांमधून केले जाते हीच एकता जपत मुस्लिम कुटुंबाने आपल्या मुलाला कृष्णाचचा वेश परिधान करून शाळेत श्रीकृष्णाची भूमिका बजाविण्यास मार्गदर्शन केले. आणि जातीपातीची बंधने दूर ठेवत मानवता धर्म शिकविला.
बेळगाव येथील सदाशिव नगर मधील, मोकाशी कुटुंबाने कृष्णा अष्टमीच्या दिवशी आपला लाडका मुलगा अदनान असिफ मोकाशी याला कृष्णाची वेशभूषा करून लक्ष वेधून घेतले आहे.
याने भगवान कृष्णाची वेशभूषा करून बासरी वाजवली. यांनतर त्याचे कौतुक करत त्याला हसत हसत शाळेत पाठवले.
समरसता ही भारताची ताकद आहे.भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, इथे अनेक जाती-धर्म आहेत, पण अलीकडे आजच्या परिस्थितीत जेव्हा धर्मांमध्ये फूट पडून एकोपा बिघडत चालला आहे.
तेव्हा हिंदू-मुस्लीम निर्माण करण्यासाठी शाळा हे महत्त्वाचे माध्यम ठरत आहे बालपणात रुजलेले संस्कारच पुढे महत्त्वाचे ठरतात म्हणूनच मुस्लिम असून देखील श्रीकृष्णाची भूमिका साकारत मोकाशी कुटुंबीयांनी सर्वांनाच एकतेचा संदेश दिला आहे.