belgaum

महिनाभरापूर्वी यरगट्टी येथे किराणा दुकानात चोरी आणि घरफोडीचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुरगोड पोलिसांनी दोघा जणांना अटक करून त्यांच्याकडील एक मालवाहू रिक्षा व किराणामाल असा एकूण 2 लाख 51 हजार रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आरोपींकडून जप्त केलेल्या चोरीच्या मुद्देमालापैकी मालवाहू रिक्षाची किंमत 2 लाख रुपये असून किराणा दुकानातील साहित्य 51 हजार रुपये किमतीचे आहे.

रामदुर्ग विभागाचे डीएसपी रामनगौडा हट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली मुरगोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मौनेश्वर पाटील यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने उपरोक्त कारवाई केली.

सदर पोलीस पथकात के. बी. अलगराऊत, व्ही. डी. सक्री, एम. बी. सन्ननाईक, ए. व्ही. ज्योतेन्नवर, बी. एस. अंतर्गट्टी, आय. एस. वकुंद, एस. एस. हुंबी आणि एस. एम. जवळी या पोलिसांचा समावेश होता. येरगट्टी येथील किराणा दुकानातील चोरी आणि घरफोडी अशा दोन्ही प्रकरणाचा छडा लावल्याबद्दल जिल्हा पोलीस प्रमुखांनी उपरोक्त सर्वांची प्रशंसा केली असून अशाच प्रकारे उत्तम कार्य करण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.