बेळगाव ते दुबई,दुबई ते बेळगाव फक्त 90 हजारात
(18 ते 23 जानेवारी या कालावधीत)
बेळगाव Liveच्या वाचकांचे स्वागत आहे. पृथ्वीराज टूर्स च्या माध्यमातून आम्ही आमच्या अंदमान टूर संदर्भात माहिती दिली होती. बेळगावकरांनी अर्थात बेळगाव लाईव्ह च्या वाचकांनी याला उत्तम असा प्रतिसाद दिला आणि सप्टेंबर, ऑक्टोबर ,नोव्हेंबर या महिन्यांसाठी अंदमानला जाणारे सावरकर प्रेमींचे ग्रुप तयार झाले. याबद्दल बेळगाव लाईव्ह चे आणि वाचकांचे आभार .
आजचा विषय आहे पृथ्वीराज सोबत आपल्याला जायचं आहे दुबईला. जुन्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाची सुरुवात एखाद्या चांगल्या ठिकाणी करायची अशी अनेकांची इच्छा असते. मित्रमंडळी, कुटुंबातील सदस्य, कामाच्या ठिकाणचे सहकारी अशा व्यक्ती सोबत वेगवेगळ्या ठिकाणी सहल काढली जाते. अशाच खास व्यक्तींसाठी यावर्षी आम्ही जानेवारी महिन्यात म्हणजेच नवीन वर्षी दुबईची सहल आयोजित करत आहोत. खास नवीन वर्षी दुबईला जाणाऱ्यांसाठी ही संधी महत्वाची ठरेल .
आपल्या जगात अनेक शहरांबद्दल लिहिले आणि बोलले जाते. सर्वात जास्त लिहिले जाते ते दुबई बद्दल. कारण दुबईचे वैभवच तसे आहे. प्रचंड गर्मी आणि इतर अनेक गोष्टी असल्या तरी दुबई बद्दल अनेकांना वेगळेच अनुभव ऐकायला पाहायला आवडतात .तेथील भल्या मोठ्या इमारती असोत व इतर अनेक ठिकाणे असून त्याचबरोबर सर्वात मोठी आकर्षणाचे केंद्र बनलेली इमारत किंवा मनोरा बुर्ज खलिफा असो साऱ्यांच्या दृष्टीने एक आकर्षण असते. त्यामुळेच दुबईला जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक खास दर पृथ्वीराज ने उपलब्ध केला आहे.
बेळगाव ते दुबई आणि दुबई ते बेळगाव हा एकूण प्रवास देणार आहोत फक्त 90 हजार रुपये इतक्या खर्चात.18 जानेवारी ते 23 जानेवारी या काळासाठी खास दुबईला जाण्याची आणि आनंद लुटून परत येण्याची संधी पृथ्वीराज टूर्स आपल्याला उपलब्ध करत आहे. त्यामुळे बेळगाव लाईव्ह च्या वाचकांना एक खास विनंती की त्यांनी आतापासूनच योग्य ते नियोजन करावे. लवकरात लवकर आपल्या प्रवासाचे बुकिंग करावे. विमानाच्या तिकिटांचे दर वाढण्यापूर्वी आपण आपले बुकिंग केले तर या खर्चात आपल्याला दुबईचा प्रवास अतिशय सुखकर असा ठरू शकतो. आता काहींच्या मनात प्रश्न पडेल की आपल्याकडे तर पासपोर्ट नाही तर दुबईला कसे जायचे? तर पृथ्वीराज टूर पासपोर्ट काढण्यासाठी ची सारी मदत आपल्याला करेल .विमानाच्या तिकिटाच्या दरम्यान व्हीजाचाही प्रश्न येईल .फिरायला जाणाऱ्यांसाठी लागणारा व्हिजा पृथ्वीराज टूर्स तुम्हाला उपलब्ध करून देईल. त्यामुळे प्रवास, राहणे, फिरणे यासारख्या पद्धतीच्या कोणत्याही शंका कुशंका मनात न घेता, संभ्रमात न अडकता, काळजी करत न बसता विदेशातली ही वैभवी शहरातील, एका श्रीमंत देशातील सहल करण्यासाठी सज्ज व्हा. तुमची सहल आनंदाची घडावी यासाठी आम्ही सज्ज आहोत.
विझा आणि ट्रॅव्हल इन्शुरन्स या 90 हजारातच मिळेल. जाणे आणि येणे हा प्रवास खर्च,दुबई सिटी,अबुधाबी सिटीची सैर,एकूण 5 ब्रेकफास्ट, 5 लंच आणि 5 डिनर, दररोज दोन लिटर मिनरल वॉटर आणि जोडीला आकर्षक लिमो राईड, डेझर्ट सफारी व ग्लोबल व्हीलेज दर्शन आलेच.
टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या दुनियेत पृथ्वीराज टूर्स ने आपले नवे पाऊल टाकले आहे. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सहली आयोजित करून पृथ्वीराज ने ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे .विद्यार्थ्यांच्या सहली असो, ज्येष्ठ नागरिकांच्या सहली असो, फक्त महिलांचे समूह असो किंवा आणखी कोणी त्यांना आनंद मिळेल. याचाच प्रयत्न पृथ्वीराज करत असतो. यामुळे लवकरात लवकर आपले बुकिंग करा. तुम्हाला एखाद्या विशेष देशात विशेष राज्यात किंवा विशेष गावात जायचे असेल. तुम्हाला तुमचा समूह घेऊन जायचे असेल किंवा एखाद्या कारणासाठी विशेष सहल करायची असेल तर पृथ्वीराज टूर्स तुमच्या सेवेला सदैव तत्पर आहे धन्यवाद.
आणि हो, येत्या वर्षी प्रवास करण्याची सुरुवात आमच्यासोबत दुबईला जाऊन करा…..फक्त आणि फक्त 90 हजार मध्ये.
आपलीच,
टीम पृथ्वीराज टूर्स
[email protected]
संपर्क 9686084656,8073324496,8748855575,