शाळा परिघात झालेल्या अपघाताच्या मालिकांमुळे सेवा फाउंडेशन वेल्फेअर ट्रस्टने वाहतूक जनजागृतीचे काम हाती घेतले आहे.फलक लावून विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्याचे काम हाती घेतले आहे.
बुधवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी या दृष्टिकोनातून एकूण शाळा आवारातील 10 क्रॉस जवळ जनजागृती चे वीस फलक लावण्यात आले आहेत सदर फलकांच्या माध्यमातून वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याबरोबर अवजड वाहनास बंदी अशा स्वरूपातील संदेश लिहिण्यात आला आहे.
पंधरवड्याच्या दरम्यान दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू झाल्यामुळे सेवा फाउंडेशनने सदर जागृतीचे काम हाती घेतले असून या दृष्टिकोनातून फिश मार्केट, संभाजी चौक,कॉलेज रोड , सेंट पॉल स्कूल या ठिकाणी जागृतीचे फलक लावले आहेत. बेळगावात दोन विद्यार्थ्यांचा अवजड वाहनांच्या धडकेने मृत्यू झाल्यानंतर पोलीस आणि सामाजिक संघटना खडबडून जागे झाल्या आहेत. यामुळेच या संघटनेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून जागृती मॅरेथॉन देखील आयोजित केली होती त्याचा दुसरा टप्पा म्हणजे अशा पद्धतीने जागृतीचे 20 फलक लावण्यात आले आहेत.
. या वेळी बोलताना वाहतूक विभागाचे एसीपी शरणप्पा म्हणाले की, सेवा फौंडेशन वेल्फेअर ट्रस्ट अपघात टाळण्यासाठी जनजागृती करत आहे हे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे.मुलांना शाळांजवळ कोणतीही अडचण येऊ नये म्हणून आम्ही सर्व खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत.
अपघात टाळण्यासाठी प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळावेत असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी सेवा फौंडेशन वेल्फेअर ट्रस्टचे अकिब बेपारी,अल्लाउद्दीन किल्लेदार,सतीश निन्गाडे,रिजवान बेपारी, अजम आर, वसीम शेख, गणेश डी तसेच अनेक पदाधिकारी उपस्थित होते.