Saturday, April 27, 2024

/

बेळगावात नेमके किती बिबट्या?

 belgaum

बिबट्याने दहशत वाजवल्याने बेळगाव परिसर भीतीच्या छायेखाली असतानाच बेळवटी परिसरात बिबट्याचे दर्शन झाले आहे. तर मागील दहा-बारा दिवसापासून रेस कोर्स परिसरात सुरू असलेली बिबट्याची शोध मोहीम देखील अखेर स्पष्ट झाली आहे. सदर रेस कोर्स परिसरातील बिबट्या टेन्ट करून असल्याचे निदर्शनास आले आहे.यामुळे आता वनविभागाची जबाबदारी वाढली असून वनखाते चांगलेच हडबडून जागी झाले आहे. यामुळे आता नेमके बिबट्या किती असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

आता शहरातील रेस कोर्स परिसरातील बिबट्याबरोबरच पश्चिम भागातील बेळवटी या ठिकाणी आढळलेल्या बिबट्याची देखील शोधमोहीम राबवावी लागणार असून पण खात्यासमोर आता मोठे आव्हान निर्माण झाले आहे. नागरिकांमधून भीतीचे वातावरण पसरले असून मानवी वस्तीत वन्य प्राण्यांचा वावर वाढला असून याचा परिणाम व्यवस्थेवर होणार आहे.

जाधवनगर परिसरात प्रथम बिबट्या चे दर्शन झाले होते यानंतर रेस कोर्स परिसरात बिबट्याने मोर्चा वळवल्या असल्याचे दिसून आले त्यानुसार मागील दहा-बारा दिवसापासून या ठिकाणी वनविभागाकडून शोध मोहीम राबविण्यात आली होती. मात्र बिबट्याचा कोणताच सुगावा लागला नव्हता अखेर बुधवारी बिबट्या या ठिकाणी घर करून असल्याची माहिती मिळाली असून काही अधिकारी आणि लोकांना देखील हा बिबट्या निदर्शनास आल्याचे समजते आहे.यामुळे आता दोन-दोन बिबट्या पकडण्याचे आवाहन वनविभागाकडे आहेForest leapord team

 belgaum

एका बाजूला बिबट्या चा शोध लागत नसल्याने वनविभाग चिंतेत असतानाच त्यामध्ये आता भर पडली असून. यामध्येच आता तालुक्याच्या पश्चिम भागातील बेळवटी परिसरात बिबट्याने दर्शन दिले आहे.त्यामुळे या भागातील शेतकरी भयभीत झाले आहेत.याचवेळी बेळवट्टी गावातील कट्टेमाळ शिवारात रविवारी सकाळी शिवाजी पांडुरंग नलावडे व त्यांच्या कुटुंबियांच्या निदर्शनास बिबट्या आला आहे.नलवडे कुटुंबीय शेतामध्ये खत फवारणीचे काम करत असताना बिबट्या दिसल्याची माहिती शिवाजी नलावडे यांनी दिली आहे.

शिवाय सदर बिबट्या एकाच दिवशी दोन वेळा दिसला आहे. कट्टेमाळ शिवाराच्या बाजूलाच हाटेकोप शिवार आहे. या ठिकाणीही एका हिंस्र प्राण्याने कुत्र्याचा फडशा पाडला आहे. सदर कुत्र्याचा शरीराचा अर्धवट भाग तसाच पडून आहे. यामुळे बेळवटी गावात बिबट्या आणि तो फडशा पडलेल्या कुत्र्याची चर्चा सुरू आहे. यामुळे बिबट्याची दहशत आता केवळ बेळगाव शहरापुरताच मर्यादित राहिली नसून पश्चिम भागात देखील बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे.आता नेमके बिबट्या किती आहेत?

 

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.