बेळगाव शहरातील रस्ते सुरक्षित करा या मागणीसाठी पालकांचे शिष्टमंडळ रहदारी विभागाच्या पोलीस उपायुक्त स्नेहा यांची भेट घेणार आहेत. गुरुवारी सकाळी 11 वाजता पोलीस आयुक्त कार्यालयात विविध शाळातील पालकांच्या वतीने रस्ते अपघाताबाबत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून निवेदन केलें वजाणार आहे.
गेल्या तीन दिवसात फोर्ट रोड आणि कॅम्प या दोन ठिकाणी अवजड वाहनाने चिडल्याने दोन विद्यार्थ्यांचा बळी गेला आहे बेळगाव शहर परिसरामध्ये तीन कि मी परिघात दहा हजार हून अधिक विद्यार्थी सकाळ दुपारी आणि संध्याकाळी रस्त्यावरून शाळा कॉलेज करिता ये जा करत असतात त्यामुळे बेळगाव शहरातील रस्त्यांची सुरक्षा महत्त्वपूर्ण आहे यासाठी पोलीस उपायुक्तांना निवेदन देण्यात येणार आहे.
बेळगाव शहरांमध्ये योग्य ठिकाणी स्पीडब्रेकर ची संख्या वाढली पाहिजे,ठराविक वेळेत अवजड वाहनांना प्रवेश बंदी झाली पाहिजे याशिवाय खड्डे मुक्त बेळगाव झाले पाहिजे व ठिकाणी रहदारीचे नियम पाळले पाहिजेत तरच अपघात टाळता येतील याबाबत देखील यावेळी चर्चा होणार आहे.
निवेदन सादर करण्याच्या अधिक माहितीसाठी पालकांनी सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव( 9964370261)यांच्याशी संपर्क साधावा असे देखील आवाहन करण्यात आले आहे