हुशार परंतु गरीब विद्यार्थी विद्यार्थिनीना पालकांच्या आर्थिक अडचणीमुळे शिक्षण घेणे कठीण होत असते. अशा विद्यार्थ्यांसाठी अनेक दानशूर व्यक्ती तसेच संघटना पुढे येत असतात.
बेटी बचाओ बेटी पढाओ हे घोषवाक्य घेऊन सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या जायंट्स सखीच्या पदाधिकाऱ्यांना अशाच एका विद्यार्थीनीचे शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी अडचण निर्माण झालेली समजली लागलीच त्यांनी त्या मुलीचे शुल्क भरण्याचे ठरवले.
उषाताई गोगटे स्कुलच्या कु. विभा कडोलकर या विद्यार्थीनीचे वार्षिक शुल्क आज शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी वडीय्यार यांच्याकडे सुपूर्द केले.यावेळी अध्यक्षा चंद्रा चोपडे, सचिव सुलक्षणा शिनोळकर, संस्थापक अध्यक्षा ज्योती अनगोळकर,फेडरेशन संचालिका नम्रता महागांवकर, उपाध्यक्षा विद्या सरनोबत अर्पणा पाटील,सुर्वणा काळे, ज्योती सांगुकर, दिपा पाटील, वैशाली भातकांडे, अर्चना कंग्राळकर उपस्थित होत्या.
या आर्थिक मदतीसाठी संजीवनी फौंडेशनच्या डॉ.सविता देगीनाळ यांचे विशेष सहकार्य लाभले.यावेळी कु.विभाच्या पालकांनी जायंट्स सखीचे आभार मानले.
शिक्षणासाठी मदत करून जायंट्स सखीने मुलींच्या प्रति असलेले ऋणानुबंध जपले.. कर्तव्याची जाण असलेल्या या संस्थेने आजपर्यंत अनेक महिला आणि मुलींना मदतीचा हात दिला आहे.