स्मार्ट सिटी असणाऱ्या बेळगावच्या कचऱ्याची विल्हेवाट मात्र डर्टीपणे लावण्यात येत आहे.सुरक्षितता स्वच्छता आणि पावित्र्य या बाबी धाब्यावर बसवून स्मार्टपणा राखण्याचा प्रयत्न केला जात आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील हुतात्मा स्मारकाच्या जवळची ही समस्या या भागाची डोकेदुखी बनली आहे.
सकाळच्या वेळी आजूबाजूच्या वार्डातील कचरा येथे आणला जातो.तो मोठ्या मोठ्या गाडीमध्ये लोड करून पुढे ट्रान्सपोर्ट केला जातो.
परिणामी या ठिकाणी कचरा दुसऱ्या गाडीत घालताना आणि त्याची उचल होताना दुर्गंधी पसरण्याबरोबरच कचरा या ठिकाणी पडतो परिणामी येथील परिसराचे पावित्र्य आणि स्वच्छता राखणे कठीण झाले आहे.
कित्येक वेळा सांगून याबाबत तक्रार करून देखील दुर्लक्ष करण्यात येत आहे.परिणामी हुतात्मा चौकाचे पावित्र्य व विहिरींची सुरक्षा ही धाब्यावर बांधली जात आहे.प्रशासनाने गांभीर्य ओळखून दखल घेणे गरजेचे बनले आहे. येथील विहिरीचे पाणी बऱ्याच वॉर्डना पुरविण्यात येते ,हे ही लक्षात घेतले पाहिजे.नुकताच स्मार्ट सिटीला पुरस्कार मिळाला आहे त्यामुळे येथे स्वच्छता राखली जावी अशी मागणी वाढू लागली आहे.
त्यात भर म्हणजे या ठिकाणी मुतारी असून त्याची स्वच्छता देखील केली जात नाही यामुळे या भागात दुर्गंधी पसरत आहेमनपाने याकडे लक्ष द्यावे अशीही या भागातील नागरिकांची मागणी आहे.