भीमगड अरण्य प्रदेशांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जांबोटी चोरला रस्त्यावर तीन झाडे कोसळून मध्यरात्री पासून सकाळी पर्यंत बेळगाव गोवा चोर्ला महामार्ग बंद होता.
खानापूर तालुक्यातील काल मनी गावाजवळ बुधवारी रात्री रस्त्यावर तीन झाडे कोसळली होती त्यामुळे सहा तास ऊन अधिक काळ दोन्ही बाजूची रहदारी बंद होती. दोन्ही बाजूंनी वाहनांची रांगा लागल्या होत्या.
खानापूर पोलीस आणि वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन अथक प्रयत्नानंतर रस्त्यावरील अडथळा दूर करून गुरुवारी सकाळी वाहतूक पूर्ववत केली. जांबोटी चोर्ला रस्त्यावर दोन्ही बाजुंनी झाडांची संख्या भरपूर आहे त्यातच अनेक झाडे वयोवृद्ध झाली आहेत तशी मोठी झाडे पावसात कोसळत आहेत.
गेल्या आठ दिवसापासूनच्या पावसामुळे अनेक ठिकाणी कच्ची घरे, वृक्ष आणि झाडे कोसळण्याचे प्रमाण वाढलेले आहे.