Sunday, April 21, 2024

/

भेट…

 belgaum

अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवुनी जाती, असेच शाळेच्या माझे विद्यार्थ्यांबद्दल वाटते मात्र हीच पाखरे जेव्हा उंच भरारी घेऊन परत येतात तेव्हा मोठा अभिमान वाटतो. असाच अभिमान या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांबद्दल आहे.

कापोली येथील मराठा मंडळ हायस्कूल ला शाळेचे माजी विद्यार्थी आणि इस्त्रो संशोधन केंद्र तिरुअनंतपुरम चे शास्त्रज्ञ प्रकाश पेडणेकर यांनी भेट दिली.

यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दहावी आणि बारावीनंतर काय करावे, अभ्यास कशा पद्धतीने करावा याचे मार्गदर्शन केले.Pednekar

शिवाय संशोधक होण्यासाठी आपली वाटचाल कशा पद्धतीने असावी कोणते उपक्रम राबवावे या बाबीची सविस्तर माहिती देऊन आपले शाळेचे दिवस आणि सध्याची स्थिती याबाबत विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणाने संवाद साधला.

यावेळी ते आपले शिक्षक संजीव वाटूपकर यांचा उल्लेख करत त्यांनी आपल्याला केलेले मार्गदर्शन कसे उपयुक्त ठरले याबाबत आठवणी सांगितल्या यावेळी शाळेचे मुख्याध्यापक एस बी घुग्रेटकर कर तसेच शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.