गोल्फ कोर्स मैदानात आढळून आलेल्या बिबट्याची शोध मोहीम युद्धपातळीवर सुरु असून अद्यापही बिबट्याचा शोध लागलेला नाही. या परिसरात अनेक शाळा असून खबरदारी म्हणून सोमवारपासून सुट्टी देण्यात आली असून शनिवारीही पुन्हा सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला असून डीडीपीआय बसवराज नलवतवाड आणि बीईओ रवी बजंत्री यांनी हि माहिती दिली आहे.
बेळगाव शहर आणि ग्रामीण शैक्षणिक क्षेत्रांतर्गत येणाऱ्या शाळांना शनिवारी देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या भागातील मुलांना विविध शाळांमध्ये पाठवताना देखील पालकांनी दक्षता घ्यावी, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत.