श्रावण महिना महिला वर्गासाठी व्रत वैकल्याचा मानला जातो.या महिन्यात प्रत्येक दिवशी विविध वतवैकल्य पार पडतात.प्रामुख्याने श्रावणातील शुक्रवारी घरोघरी वैभवलक्ष्मीचे व्रत करून मोठ्या भक्तीभावाने केले जाते. यामुळे उद्या होणाऱ्या शेवटच्या श्रावण शुक्रवारच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
श्रावणी शुक्रवार प्रामुख्याने घरोघरी पुजवला जातो. वैभव लक्ष्मीचे व्रत करून महिलांची ओटी भरली जाते.यामुळे गुरुवारी सदर लक्ष्मीव्रताच्या साहित्याची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
फळे फुले तसेच हार माळा यांची खरेदी करण्याबरोबरच देवीच्या पूजेसाठी लागणारे विविध सामान देखील खरेदी करण्यात येत होते.
यंदा श्रावण महिन्यात प्रामुख्याने चार शुक्रवार आले असून उद्याचा शेवटचा शुक्रवार असल्यामुळे लक्ष्मी व्रताचे उद्यापन करण्यासाठी आवश्यक साहित्यांची खरेदी करण्यात येत होती.
सकाळपासून पावसाने उसंत घेतल्याने महिला वर्गाचा उत्साह अधिकच वाढला होता यामुळे उद्या होणाऱ्या श्रावणी शुक्रवारच्या निमित्ताने बाजार फुलल्याचे चित्र दिसून आले.