दोन वर्षानंतर सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र यावेळी गणेश भक्तांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध नियम देखील लागू करण्यात आले आहेत. बाप्पा विराजमान झाल्यापासून बाप्पाचे विसर्जन होईल तोपर्यंत असणाऱ्या उत्साहाला गालबोट लागू नये या दृष्टिकोनातून कर्नाटक सरकारने विविध नियम लागू केले आहेत. दरवर्षी साजरा होणारा गणेशोत्सव यावर्षी धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी ज्या पद्धतीने गणेशोत्सव मंडळे सज्ज झाली आहेत त्याच पद्धतीने प्रशासनाने देखील दक्षता घेतली असल्याचे दिसून येत आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत असताना प्रत्येक मंडपामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे सक्ती करण्यात आली आहे. शिवाय मंडपात पदाधिकाऱ्यांची यादी लावणे गरजेचे असणार आहे.सकाळी सहा ते दहा या वेळेतच ध्वनीक्षेपणाचा वापर करता येणे शक्य आहे.शिवाय गणेश मंडपावर 24 तास देखरेख ठेवावी, मंडपात गर्दी असल्यास सुरक्षारक्षकाची नियुक्ती करावी. संविधानशील भागात फटाके उडविण्यास बंदी असून वादग्रस्त जागेवर मूर्ती प्रतिष्ठापनाला मज्जाव करण्यात आला आहे.
याशिवाय मंडपात अग्निशामक व्यवस्था असावी,पाण्याची व्यवस्था करावी, मूर्ती प्रतिष्ठापना केलेल्या ठिकाणी चुल लाकडे अथवा इतर ज्वलनशील पदार्थ ठेवू नयेत, विद्युत व्यवस्था आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने एक इलेक्ट्रिशन असावा.श्रीमतीचे दर्शन घेण्यासाठी अचूक अशी व्यवस्था करावी .बॅरिकेट्स उभारून कार्यकर्त्यांनी देखरेख ठेवावी.
गणेश मूर्ती प्रतिष्ठापणी पासून गणरायाचे विसर्जन होईल तोपर्यंत पदाधिकाऱ्यांनी कोणकोणत्या बाबी ध्यानात ठेवाव्या याबाबत प्रशासनाने माहिती सूचना केल्या असून त्याचे पालन करणे आवश्यक असणार आहे.स्थानिक स्वराज्य संस्थेकडून परवानगी घेतल्यानंतर मंडप सुरक्षित उभा करावा. याशिवाय मंडपाला फ्लेक्स बॅनर लावता येतील मात्र त्याकरिता वेगवेगळी परवानगी घ्यावी लागणार आहे.
गणेशोत्सवात प्रामुख्याने आगमन मिरवणूक असो अथवा विसर्जन मिरवणूक अशावेळी अनेक ठिकाणी अनुचित प्रकार घडत असतात परिणामी उत्सवाला गालबोट लागण्याची शक्यता असते यामुळे संबंधित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मिरवणुकी वेळी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी पदाधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी.मिरवणुकीमुळे किंवा मनोरंजन कार्यक्रमामुळे महिला मुलींना चिडविण्याचा प्रकार घडल्यास तात्काळ पोलिसांची संपर्क साधावा घटनेचे गांभीर्य विचारात घेऊन पदाधिकाऱ्यांनी भूमिका बजावी असे नियम प्रशासनाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जारी केले आहेत.