रेसकोर्स परिसरात असणाऱ्या बिबट्याच्या वावराबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारण बिबट्याने रेसकोर्सची भिंत ओलांडली असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शनी वन विभागाला दिली आहे. यामुळे अनेक दिवसापासून रेस कोर्स परिसरात सुरू असणाऱ्या बिबट्याच्या शोध मोहिमेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बिबट्याच्या वावराने जाधव नगर आणि परिसर,रेसकोर्स परिसरातील नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. याबरोबरच विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून या परिसरातील 22 शाळांना सुट्टी देखील देण्यात आलेली आहे.
बिबट्याला शोधून काढण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न सुरू केले आहेत मात्र आता बिबट्या रेस कोर्स परिसरात नसून त्याने रेसकोर्स ची भिंत ओलांडली असल्याची माहिती नागरिकांकडून दिली जात आहे. प्रत्यक्षदर्शींनी सदर माहिती वनविभागाला दिली आहे.
हिंडलगा गणपती मंदिरापासून हनुमान नगर ला जाणाऱ्या रोड वरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी बिबट्याने भिंत पार करताना पाहिले आहे. यामुळे बिबट्याच्या शोध मोहिमेत असणारे अधिकारी देखील बुचकळ्यात पडले आहेत.
त्यामुळे आता बिबट्या नेमका आहे कुठे असा प्रश्न वनविभागाला पडला. बिबट्याने आपले बसतान हलवले असले तरी आता बिबट्या नेमका कोणत्या परिसरात आहे याची कोणती महिती अथवा खुणा, ठसे वनविभागाला मिळालेले नाहीत.परिणामी बिबट्याला शोधू कुठे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.