खानापूर तालुक्यातील निटटूर ग्राम पंचायतीचे पी डी ओ आणि क्लार्कला लाच घेताना रंगेहाथ पकडून एसीबीने कारवाई करण्यात आली आहे. पी डी ओ श्रीदेवी आणि क्लार्क सिद्धप्पा यांना अँटी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाई नंतर जेलची हवा खायला लागली आहे.
निट्टूर ग्राम पंचायतीच्या एका व्यक्तीने संपत्तीवर नाव दाखल करण्यासाठी अर्ज केला होता वडिलांच्या निधनानंतर वडिलार्जित संपत्तीवर नाव दाखल करण्यासाठी अर्ज केला होता .
त्यांच्याकडून 4000 रुपयांची लाच मागण्यात आली होती त्यावेळी त्यांनी एसीबी कडे तक्रार केला असता ईसीवीच्या अधिकाऱ्यांनी सापळ्यात रचून पीडिओ आणि क्लर्क रंगेलाथ घेतेवेळी रंगेहात पकडले.
गुरुवारी एसीबी अधिकाऱ्यांनी निटटूर येथे धाड टाकून पैसे घेते वेळी अटक करत त्यांची कारागृहात रवानगी केली.अलीकडे ग्राम पंचायती मधून भ्रष्टाचार फोफावला आहे त्यामुळे पंचायतीमधील भ्रष्टाचार रोखण्यासाठी अश्या कारवाया होणे गरजेचे आहे.