बेळगाव जिल्हा क्रीडांगणावर विविध प्रकारच्या क्रीडाप्रकारांचा सराव करणाऱ्या क्रीडापटूंसाठी बेळगाव जिल्हा क्रीडा सबलीकरणाच्या वतीने एक नवा आदेश काढण्यात आला आहे.
बेळगाव जिल्हा क्रीडांगणावर अनेक क्रीडापटू सरावासाठी येतात. विविध भागातून विविध खेळासाठी सरावासाठी येणाऱ्या क्रीडापटूंना क्रीडाप्रकारानुसार रक्कम आकारण्याचा आदेश बेळगाव जिल्हा क्रीडा सबलीकरण यांच्या वतीने आदेश देण्यात आला आहे. या आदेशामुळे क्रीडापटू नाराज झाले असून या आदेशावर संताप व्यक्त करण्यात येत आहे.
ऍथलेटिक्ससाठी प्रति महिना सहाशेहे रुपये, बास्केटबॉल साठी तीनशेहे रुपये, व्हॉलीबॉलसाठी तीनशेहे रुपये, कबड्डीसाठी शंभर रुपये, खोखो साठी शंभर रुपये, ज्यूडोसाठी शंभर रुपये, टेनिससाठी सातशेहे रुपये, हँडबॉल साठी दोनशेहे रुपये अशा पद्धतीने प्रति महिना रक्कम क्रीडापटूंना मोजावी लागणार आहे. यासंदर्भातील आदेश बेळगाव जिल्हा क्रीडा सबलीकरण यांच्या वतीने आदेश देण्यात आला आहे.
खाजगी हद्दीत असलेले जिल्हा क्रीडांगण हे केएलइ संस्थेच्या मालकीचे असून २०११ साली या जिल्हा क्रीडांगणाचे अनावरण झाले होते. यानंतर काही नियम न पाळता अनेक सार्वजनिक क्रीडा स्पर्धा, तसेच सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन या जिल्हा क्रीडांगणावर करण्यात येत होते. मात्र आता अचानकपणे जिल्हा क्रीडांगणासंदर्भात नवे निर्णय घेण्यात आल्याने बेळगावमधील क्रीडापटू संकटात आले आहेत.
२०२५ साली या जागेचे लीज पूर्ण होणार असून शेवटच्या तीन वर्षाकरिता हा नियम का? असा प्रश्न क्रीडापटू उपस्थित करत आहेत. एका बाजूला जिल्ह्यातील क्रीडापटूंना प्रोत्साहन देण्यासाठी नवनवे उपक्रम, योजना आखण्यात येत आहेत तर दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने पैसे उकळण्यात येत आहेत, याबाबत क्रीडापटू संताप व्यक्त करत आहेत.
फक्त हा नियम स्थानिक खेळाडू करिता तितकाच आहे जे स्पोर्ट्स हॉस्टेलमध्ये असतात त्यांच्यासाठी ही रक्कम नसणार आहे.