समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे कार्य करत असते. संशोधन हे मानवाच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे; तो वेळोवेळी जागरूक ठेवणे महत्त्वाचे आहे. संशोधन वृत्तीमुळे सृजनशीलता वृद्धिंगत होते त्याला पुन्हा प्रेरित करण्यासाठी प्रोत्साहन देणे महत्त्वाचे असून कार्य करण्याची जबाबदारी वाढवली पाहिजेत. वेगवेगळ्या विषयांच्यावर संशोधन करणे उपाययोजना आखणे आणि भविष्यात त्याचा देशाचा विकासाकरिता उपयोग होणे याकरिता कार्य करण्याची जोखीम आजच्या तरुण पिढीकडे आहे हे विसरता कामा नये.
शिक्षण आणि समाजामध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्यासाठी प्रेरणादायी कार्य आपण करणे अत्यंत गरजेचे आहे आणि ते पुढे यशस्वी नेण्यासाठी विद्यार्थी शिक्षक आणि समाजातल्या सर्व घटकांनी पुढाकार घेऊन सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रयत्न करणे आज काळाची गरज बनली आहे. शिक्षकांनी चांगले संस्कारमय शिक्षण देऊन परिपक्व समाज निर्मितीसाठी प्रयत्न करायला हवे. *प्रतिपादन जॉन बास्को विश्वविद्यालय कुर्ला मुंबईच्या शिक्षणतज्ञ, संशोधक साहित्यिका प्राचार्या डॉ. पार्वती व्यंकटेश यांनी केले.*
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ भाऊराव काकतकर पदवी महाविद्यालय कॅम्प बेळगाव येथे यूजीसीच्या अंतर्गत नियमानुसार न्याक मूल्यांकन शुक्रवार दिनांक 5 ऑगस्ट आणि शनिवार दिनांक सहा ऑगस्ट 2022 रोजी दोन दिवशीय कमिटीने महाविद्यालयाला भेट देऊन सर्व प्रकारचे विविध निकष लावून तपासणी केली.
*न्याक मूल्यांकन पीर कमिटीचे अध्यक्ष हैदराबाद क्लस्टर युनिव्हर्सिटीचे कुलगुरू व शिक्षणतज्ञ प्रा. डॉ. साईगोपाल बी.व्ही.आर ,,**मूल्यांकन समितीचे समन्वयक न्यू दिल्ली जामिया मिलिया इस्लामिया सेंट्रल युनिव्हर्सिटी चे संशोधक ज्येष्ठ अभ्यासक विचारवंत प्रा. डॉ. विश्वजीत दास*
*जॉन बॉस्को महाविद्यालय कुर्लामुंबई महाराष्ट्र येथील ज्येष्ठ विचारवंत शिक्षण तज्ञ संशोधक साहित्यिका प्राचार्य डॉ. पार्वती व्यंकटेश मूल्यांकन समितीच्या सदस्या म्हणून उपस्थित होत्या.*प्रारंभी महाविद्यालयाच्या प्रांगणात प्रवेशद्वारापासून ते महाविद्यालयाच्या ऑफिसपर्यंत विद्यार्थी फलक प्राध्यापक कर्मचारी व्यवस्थापक मंडळीचे पदाधिकारी यांनी साखळी नकाशाचे आयोजन करून टाळ्यांच्या गजरात जल्लोषी स्वागत केले; आणि पुष्पगुच्छ स्मृतिचिन्ह, शाल देऊन मूल्यांकन अधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
व्यासपीठावर डीएमएस मंडळाचे उपाध्यक्ष ॲड. राजाभाऊ पाटील, मंडळाचे सचिव प्रा. विक्रम पाटील, डॉ. दीपक देसाई, नारायण. बी खांडेकर, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आर. वाय. पाटील, सचिव प्रा. सी. वाय. पाटील, कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. एन. पाटील, माजी विद्यार्थी संघटनेचे समन्वयक प्रा. डॉ. एम. व्ही. शिंदे, ए. के. जाधव व्यासपीठावर उपस्थित होते.