बिबट्याच्या शोध मोहिमेचा 25 वा दिवस उजाडला तरी देखील बिबट्या जेरबंद झालेला नाही.यामुळे दिवसेंदिवस सुरू असणारे कोंबिंग ऑपरेशन रविवारी देखील सकाळपासूनच सुरू करण्यात आले. मात्र रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने केवळ ८० वनखात्याचे कर्मचारी या कोंबिंग ऑपरेशन मध्ये रुजू असल्याचे दिसून आले.एका बाजूला आजचा रविवारचा दिवस म्हणून बिबट्या ला सुट्टी आहे असे म्हणत सोशल मीडियावर विनोदाची धूम सुरू असताना. बिबट्या सर्चिंग ऑपरेशन केवळ ८० कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत राबविण्यात येत आहे.
शनिवारी बिबट्याला शोधण्यासाठी वनखात्याचे साधारण 300 हून अधिक कर्मचारी कार्यरत होते मात्र रविवारी सदर सर्चिंग ऑपरेशन मंदावल्याचे दिसून आले. केवळ ८० कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे.रविवारी बिबट्याला शोधण्यासाठी कोणतीही विशेष मोहीम राबविण्यात आली नाही.
25 दिवसापासून मोठ्या प्रमाणात वनविभाग आणि पोलीस विभाग त्या ठिकाणी बिबट्याला शोधत आहे मात्र बिबट्याला जेरबंद करणे शक्य झाले नसून रेस कोर्स मैदानाच्या बाहेर पोलीस बंदोबस्त आणि आतील बाजूला ८० कर्मचारी शोध मोहिमेत असे चित्र रविवारी पाहायला मिळाले.
तर दुसऱ्या बाजूला रविवारी सुट्टीचा दिवस असून बिबट्याला देखील सुट्टी आहे, असे म्हणत बिबट्याचे फोटो घालून ट्रॉल केला जात आहे.तसेच हॅप्पी संडे बिबट्या, संडे इज हॉलिडे बिबट्या,आज आहे सुट्टीचा दिवस असे विविध मेसेज व्हींडियो करून वन खात्याच्या हाती नाही मात्र सोशल मीडियाच्या हाती बिबट्या मिळाला असल्याचे या विनोदावरून दिसून येत आहे.