बिबट्याच्या शोध मोहिमेला पंधरवडा उलटून गेला आहे.तरीदेखील बिबट्याला शोधण्यात वनविभागाला यश आलेले नाही. हाती बनेंगे साथी याप्रमाणे शिमोगा येथून आणलेल्या हत्तीवरून बुधवारी सकाळपासून शोध मोहीम राबविण्यात आली.मात्र हत्तीवरून शोध मोहिमेचा पहिला दिवस अपयशी ठरला आहे. यामुळे गुरुवारी पुन्हा सकाळपासूनच हत्तीवरून बिबट्याला शोधण्यासाठीची मोहीम सुरू झाली आहे.
शार्प शूटर्स वनविभागाचे अधिकारी तसेच कर्मचारी यांच्यासह 300 हून अधिक कर्मचारी या मोहिमेमध्ये सहभागी झाले आहेत. मात्र अजूनही बिबट्याला पकडण्यात यश आलेले नाही बिबट्या वनविभागाला चकवा देऊन निसटल्या नंतर कोंबिंग ऑपरेशन च्या माध्यमातून शोधमोहीम करण्यात आली होती. रेस कोर्स जंगलाचा अडीचशे एकर परिसर पिंजून काढण्याबरोबरच जंगलाच्या चारही बाजूने कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता मात्र तरी देखील वनविभाग अपयशी ठरला असून आता बिबट्या मिशन साठी हत्तीवरच भरोसा ठेवला आहे. पहिल्या दिवशी अपयश आल्याने आता जोरदार शोध मोहीम राबविली जात आहे.
विसाव्या दिवशी देखील बिबट्या मोकाटच फिरत असल्याने भीती निर्माण झाली आहे. विविध प्रकारे बिबट्या मिशन राबवून देखील सातत्याने अपयशच आल्याने बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करणे गरजेचे बनले आहे.
चारही बाजूने वनविभागाचे कर्मचारी आणि पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून देखील बिबट्या निदर्शनास आलेला नाही यामुळे गुरुवारी सकाळपासूनच हत्तीवरून बिबट्या शोधण्या साठी बिबट्या मिशन सुरू झाले.शिवाय या ठिकाणी असणारी झाडे झुडपे यामुळे रस्ता दिसत नसल्याने जेसीबी च्या झाडे झुडपे देखील पिंजून काढण्यात येत आहे.
हायटेक सेंसर कॅमेरा,सीसीटीव्ही,कॅमेरे, ड्रोन याशिवाय श्वान पथक देखील रेस कोर्स मैदानात बिबट्याच्या शुद्ध मोहिमेसाठी उतरविण्यात आले होते. मात्र तरी देखील बिबट्याला जेरबंद करता आले नाही.यामुळे आता अर्जुन व आले या हत्तीवर भरोसा ठेऊनच वनखात्याची बिबट्या शोध मोहीम सुरू झाली आहे.