Thursday, December 19, 2024

/

‘ ते राष्ट्राभिमानासाठी दौडले एकसाथ’

 belgaum

बेळगावचा मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर अंगात जाज्वल्य देशभक्ती निर्माण करणारे एक ठिकाण, सीमेवर शत्रूशी लढणारे सैनिक तयार करणारं त्यांच्यात देशभक्तीची भावना जागृत करणारे हे मराठा रेजिमेंटल सेंटर… आझादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने बेळगावच्या मराठा सेंटरमध्ये शालेय विद्यार्थ्यांत देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी मिनी मॅरेथॉनचे आयोजित आयोजन करण्यात आले होते.

रविवारी झालेल्या या मिनी मॅरेथॉन मध्ये हजारो विद्यार्थ्यांनी एक साथ दौड लावली मिनी मॅरेथॉनला मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर आणि स्टेशन कमांडर ब्रिगेडियर जयदीप मुखर्जी यांनी हिरवा ध्वज दाखवून सुरुवात केली.

बेळगावच्या मुलांमध्ये राष्ट्राविषयी अभिमानाची भावना जागृत करणे आणि राष्ट्रवादाची भावना जागृत करणे हा मिनी मॅरेथॉनच्या आयोजनाचा उद्देश होता. मिनी मॅरेथॉन ही “राष्ट्रीय एकता” या थीमवर आधारित होती आणि ती आझादी का अमृत महोत्सवाच्या उपक्रमा अंतर्गत स् हाती घेण्यात येणाऱ्या उपक्रमांचा एक भाग होती.Mlirc bgm

13 ते 17 वर्षे वयोगटातील विविध शालेय मुला-मुलींसाठी मिनी मॅरेथॉनचे दोन गटात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने शालेय मुलांनी सहभाग घेतला आणि 5 किमी अंतर यशस्वीरीत्या पार केले.

मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदिप मुखर्जी यांच्या हस्ते विविध श्रेणीतील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्याबद्दल त्यांनी सर्वांचे कौतुकही केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.