आपात्कालीन मदतीसाठी श्रीराम सेनेच्या स्वयंसेवकांनी समाजाला मदत करण्यासाठी कायम तत्पर राहावे.समाजाला कधीही मदतीची गरज लागल्यास मदतीसाठी आणि अन्याय झाल्यास अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी सज्ज रहा असे आवाहन श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी केले.
रविवारी सायंकाळी महात्मा फुले रोड येथील मराठा सांस्कृतिक भवन येथे श्रीराम सेना हिंदुस्तान च्या कार्यकर्त्यांची बैठक झाली त्या बैठकीत ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते.
टिळक चौकात 14 आगष्ट रोजी होणारा अखंड भारत संकल्प दिनाच्या कार्यक्रमाचे नियोजन, सार्वजनिक गणेश उत्सव आणि संभाव्य पूर स्थिती व इतर आपत्कालीन मदतीसाठी, श्री राम सेना हिंदुस्थानची बैठक रविवारी सायंकाळी मराठा सांस्कृतिक भवन येथे बैठक झाली.
बेळगाव शहर आणि ग्रामीण भागांतून शेकडो श्रीराम सेनेच्या कार्यकर्ते या बैठकीला हजेरी लावली होती . श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना गणेशोत्सव आगामी गणेशोत्सव शांततेत उत्साहात पार पाडण्यासाठी योगदान देऊया याशिवाय संभाव्य आपत्कालीन परिस्थितीत मदत देण्यासाठी श्रीराम सैनिकांनी सदैव कार्यतत्पर राहायचे आहे यासाठी कायम रहा सज्ज रहा असे आवाहन केले.
मागील काही दिवसांपूर्वी श्रीराम सेना हिंदुस्तान ने चिकनगुनिया आणि डेंगू लसीकरण शिबिर घेत हजारो समाज बांधवांना याचा लाभ दिला होता याशिवाय रक्तदान शिबिरात एका दिवसात चारशेहून अधिक रक्तांच्या युनिटचे संकलन केले केले होते असेच समाजकार्य यापुढेही सर्वांनी करायचे आहे आणि समाजासाठी योगदान द्यायचे आहे असे रमाकांत कोंडुस्कर यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
यावेळी बोलताना सचिन पाटील यांनीही कार्यकर्त्यांना मौलिक मार्गदर्शन करताना कोणत्याही राष्ट्रीय पक्षांना श्रीराम सेना हिंदुस्तानच्या कार्यकर्त्यांचा वापर करायला देता कामा नये असे सांगत आपण सदैव रमाकांत कोंडुसकर यांच्या पाठीशी राहूया असा निर्धार व्यक्त केला.
यावेळी बेळगाव शहरातील दक्षिण उत्तर आणि ग्रामीण भागातून शेकडो कार्यकर्त्यांनी बैठकीला हजेरी लावली होती