Tuesday, December 24, 2024

/

‘मध्यवर्ती गणेश महामंडळ’ अध्यक्षपदी रमाकांत कोंडुस्कर

 belgaum

श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांची गणेश महामंडळाच्या अध्यक्षपदी तर देवस्थान कमिटी पंच रणजीत चव्हाण पाटील कार्याध्यक्षपदी निवड झाली.

पाटील गल्ली येथील सिद्धनाथ जोगेश्वरी मंदिराच्या सभागृहात रविवारी सायंकाळी मध्यवर्ती गणेश महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीमध्ये 2022-23 साठी कोंडुस्कर यांची सर्वानुमते महामंडळाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

महामंडळाच्या स्वागताध्यक्षपदी मदन बामणे, सरचिटणीस महादेव पाटील, उपाध्यक्षपदी रमेश पावले, रमेश कळसन्नावर, सतीश गोरगोंडा, बाबुलाल राजपुरोहित, शिवराज पाटील यांची तर सचिवपदी सागर पाटील आणि बळवंत शिंदोळकर, जनसंपर्क प्रमुख पदी विकास कलगटगी म्हणून निवड झाली आहे.

गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विधायक गणेशोत्सव कसा साजरा करावा याबाबतीत मार्गदर्शन करतेवेळी रमाकांत कोंडुस्कर यांनी शहरातील गणेश मंडळांच्या ज्या समस्या असतील त्या सर्वतोपरी सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल याशिवाय मूर्तिकार असो मंडप डेकोरेटर, साऊंड सिस्टिम असो किंवा गणेशोत्सवाशी निगडित लहान मोठे व्यवसायिक असो सगळ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी महामंडळ पुढाकार घेईल.Ramakant k ganesh

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना पत्र लिहून उत्सवातील समस्या अवगत करून दिलेल्या आहेत याशिवाय सतत जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत मध्यवर्ती महामंडळाच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे त्यामुळे सर्व समस्या सोडवल्या जातील असे कोंडस्कर यांनी ठासून सांगितले

गणेश मंडळांनी विधायक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, गणेश मंडपातून चिकनगुनिया, डेंग्यू लसीकरण शिबिरे, रक्तदान शिबिरे,व्यसनमुक्त समाज बनवण्यासाठी जनजागृतीची व्याख्याने, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, गोरगरिबांना आधार देणे आर्थिक मदत करणे असे सामाजिक उपक्रम राबवून समाजाच्या जडणघडणाला हातभार लावला पाहिजे असे रमाकांत कोंडस्कर यांनी प्रतिपादन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.