Monday, November 18, 2024

/

श्री गणेशोत्सवासाठी फक्त दोन टॉपना मुभा -पोलीस उपायुक्त गडादी

 belgaum

येत्या श्री गणेशोत्सव काळासह श्री गणेश विसर्जन मिरवणुकीप्रसंगी साऊंड सिस्टिमसाठी बेस न वापरता फक्त दोन टॉप (बॉक्स) वापरण्यात यावेत. सरकारच्या सूचनेवरून हा आदेश जारी करण्यात आला असून याचे उल्लंघन करणाऱ्या साऊंड सिस्टिम मालक आणि संबंधित गणेशोत्सव मंडळ पदाधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी यांनी सांगितले.

शहरातील मार्केट एसीपी कार्यालय आवारात आज शुक्रवारी दुपारी बोलविलेल्या बेळगाव सार्वजनिक श्री गणेश उत्सव महामंडळ, साऊंड सिस्टिम डॉल्बी ओनर्स असोसिएशन, लोकमान्य गणेशोत्सव महामंडळ आणि शहापूर विभाग सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ यांच्या संयुक्त बैठकीत पोलीस उपायुक्त गडादी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. बैठकीत श्री गणेशोत्सव काळात दोन टॉप व दोन बेस लावण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी साऊंड सिस्टिम डॉल्बी ओनर्स असोसिएशनच्यावतीने पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली.

त्यावर उपस्थितांना मार्गदर्शन करताना पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी यांनी सर्वोच्च न्यायालय, कर्नाटक उच्च न्यायालय आणि सरकारच्या आदेशाची आम्ही अंमलबजावणी करत आहोत. आमच्या हातात काही नाही न्यायालयाचा आदर सर्वांनी केला पाहिजे आपली संस्कृती डीजे संस्कृती नाही तर पारंपारिक वाद्य आहे. त्यामुळे पारंपारिक वाद्यांद्वारेच आपला हिंदू सण उत्साहात साजरा झाला पाहिजे. तेंव्हा साऊंड सिस्टिम डॉल्बी असोसिएशनच्या पदाधिकारी व सदस्यांनी आदेशाचे पालन करून सहकार्य करावे असे सांगून यदाकदाचित जर कोणी सहकार्य केले नाही तर सर्वप्रथम त्या डॉल्बी मालकावर कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यानंतर संबंधित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल, असे गडादी यांनी स्पष्ट केले.Ganesh maha mandal

यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्यावतीने देखील दोन टॉप व दोन बेसची मागणी करण्यात आली. त्याचप्रमाणे गणेशोत्सव झाल्यानंतर आठ दिवसात बेळगावातील सर्व जाती धर्माच्या नेतेमंडळांची बैठक बोलावून पुढील काळात कोणताही सण अथवा मिरवणुकींमध्ये डॉल्बीच्या वापरावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी केली गेली. अन्यथा पुढील महिन्यात एखादा उत्सव असेल आणि त्याला डॉल्बीची परवानगी देण्यात आली असे होता कामा नये. पुढील काळात एखाद्या मिरवणुकीमध्ये डॉल्बीची परवानगी देण्यात आली तर ती गोष्ट खपवून घेतली जाणार नाही, गणेश भक्त तुम्हाला माफ करणार नाहीत. शिवाय त्यावेळी निश्चितपणे पोलीस प्रशासनाला जाब विचारला जाईल हे लक्षात घ्यावे, असेही महामंडळातर्फे सुचित करण्यात आले. बैठकीत गणेशोत्सव महामंडळातर्फे पदाधिकारी विजय जाधव, विकास कलघटगी, सतीश गोरगोंडा बाबूलाल राजपुरोहित आदींनी आपले मत व्यक्त केले.

बैठकीस मार्केट विभागाचे एसीपी म्हणून नुकतेच दाखल झालेले एन. व्ही. बरमनी, एसीपी सदाशिव कट्टीमनी, एपीएमसी पोलीस ठाण्याचे सीपीआय मंजुनाथ हिरेमठ, मार्केटचे सीपीआय तुळशीगेरी, बेळगाव ग्रामीणचे एसीपी यांच्यासह सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे विजय जाधव, विकास कलघटगी, सुनील जाधव, हेमंत हावळ, नेताजी जाधव, राजकुमार खटावकर, प्रवीण पाटील, गिरीश धोंगडी, गजानन हंगिरगेकर, सागर पाटील, महादेव पाटील, रमेश कळसन्नावर, रमेश सोनटक्के आदींसह तीनही महामंडळाचे पदाधिकारी व कार्यकारणीचे सदस्य उपस्थित होते.

महादेव पाटील सन्मानित 

जन्मदिनाचे औचित्य साधून पोलीस प्रशासन आणि सर्व गणेश महामंडळाच्या बैठकीत मध्यवर्ती गणेश महामंडळाचे सरचिटणीस महादेव पाटील यांचा सत्कार करण्यात आला. डीसीपी रवींद्र गडादी यांनी महादेव पाटील यांनी गेल्या अनेक गणेशोत्सवामध्ये गणेश महामंडळाच्या माध्यमातून योगदान दिल्याबद्दल त्यांचा गुच्छ देऊन सत्कार केला लोकमान्य महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव यांनी पाटील यांच्या योगदानाबद्दल त्यांचा सत्कार व्हावा अशी मागणी केल्या वर पोलीस प्रशासनाने त्यांचा सत्कार केला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.