बेळगाव जिल्हा मराठा समाज समन्वय समितीच्या वतीने शासनाच्या विविध समाजोपयोगी योजनांसंदर्भात जागृती करण्यासाठी मराठा समाजाचे नेते किरण जाधव गुणवंत पाटील,सुनील जाधव, अक्षय साळवी , राजन जाधव,यांनी शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे मराठा समाजाला आवाहन केले आहे.
कर्नाटक मराठा समाज विकास महामंडळाचे अध्यक्ष मारुतीराव मुळे व मराठा समाजाचे युवा नेते किरण जाधव यांनी 18 आगस्ट रोजी बंगळूर येथे झालेल्या बैठकीत 5 सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याची मुदतवाढ मजूर करून घेतली आहे
कर्नाटक मराठा समाज विकास महामंडळाने विविध योजनांतर्गत कर्ज सुविधांसाठी अर्ज आमंत्रित केले होते अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 आगस्ट 2022 होती ती आता 5 सप्टेंबर पर्यंत करण्यात आली आहे . कर्ज सुविधा योजनेंतर्गत, आर्थिक क्रियाकलाप करण्यासाठी 4 टक्के व्याजदराने 2 लाख रुपयांपर्यंत कर्जाची सुविधा दिली जाते.
या योजनेची सुविधा मिळण्यासाठी स्वयंरोजगारासाठी आर्थिक क्रियाकलाप करण्यासाठी रु.50,000 पर्यंतची आर्थिक मदत दिली जाईल . ज्यांना 20% अनुदान आणि शिल्लक 4% व्याजदरासह कर्ज सुविधा मिळवायची आहे त्यांनी सुविधा सॉफ्टवेअरद्वारे ऑनलाइन अर्ज करावा. .इच्छुक उमेदवार 4 सप्टेंबरपर्यंत गुडशेड रोड तिसरा क्रॉस येथील किरण जाधव यांच्या कार्यालयात संपर्क साधावा संपर्क क्रमांक अक्षय +91 81979 57544 किंवा मारुती मंगल कार्यालय समोर चवाट गल्ली बेळगाव येथील सुनिल जाधव सेवा केंद्राच्या कार्यालयात संपर्क साधू शकता संपर्क क्रमांक 9964370261
पात्रता निकष आणि आवश्यक कागदपत्रे
@ आधार कार्ड
@ रहिवासी प्रमाणपत्र
@ उत्पन्नाचा पुरावा
@ वयाचा पुरावा
@ पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
@ मोबाईल नंबर
@ ई – मेल आयडी
@ शिधापत्रिका
@ जात प्रमाणपत्र इ