Saturday, November 23, 2024

/

त्याला स्थलांतरीत करा….

 belgaum

बिबट्याची शोध मोहीम दिवसेंदिवस तीव्र होत असताना बिबट्या मात्र हाती सापडत नाही. परिणामी वनविभागाला आलेले अपयश आणि यामुळे निर्माण झालेली स्थिती यावर सातत्याने बोलले जात आहे. रविवारी काँग्रेस महिला कार्यकर्त्यांनी निदर्शने करून वनविभागाला धारेवर धरले असताना सोमवारी आणखी एका आंदोलनाची पुनरावृत्ती झाली.मात्र सदर आंदोलन बिबट्याला वाचवा यासाठी होते.तरुणाईने वाइल्ड ऍनिमल वाचवा नेचर वाचवा असे म्हणत बिबट्याला मारू नका स्थलांतरीत करा अशी मागणी केली आहे.

बिबट्याला शोधण्यासाठी 25 दिवस झाले वनविभाग त्या ठिकाणी सज्ज आहे. तरी देखील बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलेले नाही. दिवसेंदिवस बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करा अशी मागणी करण्यात येत असून शिवाय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.तसेच हे सत्ताधारी पक्षाचे अपयश असून विरोधी पक्ष त्यांच्यावर हल्लाबोल करत आहे.यामुळे वनविभाग सर्व बाबींचा विचार करून बिबट्याला जेरबंद करता आले नाही तर त्याला मारण्याबाबत पुढाकार घेण्याची शक्यता असल्याने पर्यावरण रक्षक जंगल प्रेमी तरुणाईने त्या ठिकाणी आंदोलन केले.

निदर्शने करत असताना तरुणाईने बिबट्याला मारू नका,तो जेवणाच्या शोधात या ठिकाणी आला आहे,अजूनही त्याने कोणावरही हल्ला केला नाही, जंगले वाचवा, जंगली प्राणी वाचवा,पर्यावरण वाचवा अशा अशा संदेशाचे फलक हाती घेऊन निदर्शने केली. गोल्फ कोर्स मैदानाच्या प्रवेशद्वाराजवळ निदर्शने केली साधारण 40 ते 50 विद्यार्थी त्या ठिकाणी आंदोलनासाठी दाखल झाले होते.Protest

वनविभाग दररोज बिबट्याला पकडण्यासाठी जंगल पछाडत असताना बिबट्या मात्र हातात सापडत नसल्याचे दिसून येत आहे. बिबट्याच्या बाबत आता नाट्यमय परिस्थिती निर्माण झाली असून बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागावर येणारा ताण वाढला आहे. विनोद,राजकारणाची इंट्री आणि त्याला मारू नये यासाठी वाइल्ड ऍनिमल सेवर यांची आंदोलने यामुळे बिबट्या चांगलाच चर्चेत आला आहे.

यावरून राजकारण चांगलेच घडले असून तरुणाईने देखील यामध्ये इंट्री करत बिबट्याला मारू नका त्याला स्थलांतरित करा असे आवाहन वनविभागाला केले आहे यामुळे आता बिबट्याला पकडण्याबरोबरच सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याची जबाबदारी देखील वाढली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.