शुक्रवारी दुपारी जाधव नगर परिसरात बिबट्याने एका कामगारावर हल्ला करत किरकोळ दुखापत केल्याची घटना घडल्या नंतर बिबट्याचा शोध घेण्यासाठी वन खाते पोलीस अग्निशामक दलाची शोध मोहीम सुरु असताना बेळगाव पोलिसांनी बेळगावातील जनतेला रात्री अपरात्री घर बाहेर पडू नये असे आवाहन केले आहे.
पोलीस आयुक्त डॉ एम बी बोरलिंगय्या यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे बेळगावकर जनतेला विशेषतः झाडी झुडुपे असलेल्या परिसरात राहणाऱ्या लोकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. जाधव नगर आणि आसपासच्या परिसरातील सी सी टी व्ही शोधला असता बिबट्या दिसला असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
रात्रीच्या वेळी लहान मुलांना एकट्याना खेळायला घर बाहेर सोडू नये, विनाकारण एकटे फिरू नये या शिवाय बॉकसाइट रोड, रेस कोर्स आदी परिसरात मॉर्निंग वॉक करणाऱ्यांनी खबरदारी घ्यावी तसेच आपल्या लहान मुलांकडे अधिक लक्ष द्यावे असे आवाहन केले आहे.
बेळगाव शहर परिसर आलेला बिबट्या कुणालाही दिसल्यास किंवा तुच्या घरा बाहेर दुकानांत बसवलेल्या सी सी टी व्ही मध्ये आढळ्लयास पोलीस कंट्रोल रूम किंवा ११२ क्रमांक किंवा वन खात्याला कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे.
वनविभाग बेळगाव यांनी जनहितार्थ जारी केलेले संपर्क आणि नंबर्स
१} राकेश अर्जुनवाड आरएफओ बेळगाव ९७३९२९५६७१
2} विनय गौडर DRFO बेळगाव टाउन 7022081277
३} मल्लीकार्जून जे – ९७४३७८८५८५
4} सिद्धार्थ चलवादी -7022826394