Saturday, November 9, 2024

/

7 कॅमेरा ट्रॅप 3 पिंजऱ्या सह सुरू आहे अशी शोध मोहिम

 belgaum

बेळगाव येथील जाधव नगरमध्ये एका गवंडी कामगारावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी घडल्यानंतर शनिवारीही वनविभागाने या परिसरात कोंबिंग ऑपरेशन केले आहे. वनाधिकारी, पोलीस, एसडीआरएफ आणि अग्निशमन दल सर्वजण त्या बिबट्याचा शोध घेत आहेत.

वन खात्याने दिलेल्या माहितीनुसार शोध मोहिमेत सहभागी टीमला मिळालेल्या कोणत्याही प्रकारच्या इनपुटची छाननी केली जात असून त्याकडे दुर्लक्ष केले जात नाही अनेक लोकांनी साइटवर टीमला माहिती दिली आहे. विविध माहिती आणि कोम्बिंग ऑपरेशन्सनंतर आतापर्यंत वनविभागाने जाधव नगर येथे एक आणि रेसकोर्स येथे 2 असे पिंजरे लावले आहेत.पिंजऱ्यात कुत्रा ठेवण्यात आला आहे.

वन्य जीवी फिरू करू शकतात अश्या ठिकाणी किंवा दाट झाडी झुडुपे आहेत अश्या 7 ठिकाणी कॅमेरा ट्रॅप्स देखील बसवण्यात आले आहेत.सात ठिकाणी कॅमेरा ट्रॅप बसवण्यात आला आहे कॅमेरा ट्रॅप 50 मीटर आजू बाजूनी प्राण्यांची हालचाल झाल्यास फोटो काढला जातो.

मिळालेल्या माहिती जाधवनगर मधील लोकांनी सदर प्राणी बिबट्याचं असल्याचे तो फिरत आहे ठामपणे सांगितले तर हनुमाननगर भागातील लोकांनी याबाबत संशय व्यक्त केला आहे.शुक्रवारी रात्री प्रमाणेच शनिवारी रात्री देखील वन खात्याने रहिवाश्यांसाठी अलर्ट जारी ठेवला आहे. वन खात्याने 24 तास रेस कोर्स परिसरात ठाण मांडला असून पेट्रोलिंग सुरू आहे.

Leapord
बेळगाव जाधव नगर येथील झुडुपात बिबट्याला पकडण्यासाठी वन खात्याने असा रचला आहे साफळा

जुलै 2021 मध्ये बेळगाव येथील रेसकोर्स मैदानाजवळ एक बिबट्या दिसला होता, परंतु आठवडाभरानंतरही ठोस काहीही पुरावा हाती न लागल्याने शोध थांबवण्यात आला.

पोलीस विभागाने रेसकोर्स आणि गोल्फ कोर्सच्या आजूबाजूच्या भागात विशेषत: जाधव नगर, हनुमान नगर, आणि जलतरण तलाव आणि आतापर्यंत बिबट्या दिसलेल्या ठिकाणी अलर्ट जारी केला आहे.सखोल शोध सुरू आहे आणि पोलिसांनी नागरिकांना विनंती केली आहे की त्यांनी विशेषत: या भागात नाईट वॉकला किंवा मॉर्निंग वॉकला जाऊ नये आणि मुलांवर लक्ष ठेवण्याची विनंती केली आहे आणि ते होईपर्यंत त्यांना विशेषत: घराबाहेर सोडू नका असे आवाहन केले आहे.

या भागांच्या आजूबाजूची घरे आणि व्यावसायिक ठिकाणावर पोलिसांनी बिबट्याच्या हालचालीसाठी त्यांचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची विनंती केली आहे आणि त्याची माहिती एकतर पोलिस किंवा वन विभागाला द्यावी असे आवाहन देखील केले आहे.Cage race course

व्हीडिओ व्हायरल- फॅक्ट चेक #fact check
बेळगाव येथील एका कंपाऊंडमध्ये बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केल्याच्या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे मात्र तो व्हीडिओ आताचा आणि बेळगावचा नाही आहे व्हायरल होत असलेला तो व्हीडिओ 7 महिन्यांपूर्वी नेपाळ काठमांडू येथून अपलोड करण्यात आला होता.

बिबट्या/काही म्हणतात चित्ता पकडला गेला आहे असे लिहित आणखी 29 सेकंदांचा व्हिडिओ शेअर केला जात आहे हे देखील चुकीचे असून तो व्हीडिओ बेळगावचा आहे कालचा आहे त्या प्राण्याला (Bait)पिंजऱ्यात ठेवतानाचा व्हीडिओ आहे.

कोणतेही व्हिडिओ पडताळणीशिवाय फॉरवर्ड करू नकाअसे आवाहन करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.