बेळगाव शहरातील जाधव नगर परिसरात बिबट्या सदृश्य प्राण्याने हल्ला केल्याने एक कामगार किरकोळ जखमी झाला आहे. त्या नंतर त्या प्राण्याला शोधण्याची मोहीम सुरु झाली आहे त्या पाश्वभूमीवर बेळगावच्या वन खात्याने जाधव नगर आणि आसपासच्या रहिवाश्या साठी महत्वाची सूचना जारी केली आहे.
बेळगाव शहरातील जाधव नगर येथे शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास जाधव नगर प्लॉट क्र. 1369 मधील बांधकामाधीन इमारतीत काम करणाऱ्या सिद्राय निलजकर नामक कामगारावर बिबट्या सारख्या जंगली प्राण्याने हल्ला केला किरकोळ जखमी केले जखमींला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे जाधव नगर परिसरात वनविभाग, पोलीस विभाग, अग्निशमन दल, एसडीआरएफची टीम बिबट्या सदृश्य प्राण्याला पकडण्यासाठी मोहीम सुरु केली आहे.
आमदार सतीश जारकीहोळी, अंजली निंबाळकर यांच्या सह माजी आमदार फिरोज सेठ आणि काँग्रेस नेते अनिल पोतदार यांच्या सारखे व्ही व्ही आय पी राजकारणी वास्तव्यास असलेला परिसरात बिबट्या सदृश्य प्राण्याचे दर्शन झाले आहे.
वन खात्याने जाधव नगरमधील रहिवासी आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना विनंती करत, कोणत्याही वन्य प्राण्याची (बिबट्याची) हालचाल दिसल्यास कृपया खालील क्रमांकावर संपर्क साधून त्वरित माहिती द्यावी तसेच अशा वन्य प्राण्यांच्या हालचाली जनतेने पाहिल्यावर त्यांना घाबरू नये असे आवाहन केले आहे.
वनविभाग बेळगाव यांनी जनहितार्थ जारी केलेले संपर्क आणि नंबर्स
१} राकेश अर्जुनवाड आरएफओ बेळगाव ९७३९२९५६७१
2} विनय गौडर DRFO बेळगाव टाउन 7022081277
३} मल्लिकाराजुन जे – ९७४३७८८५८५
4} सिद्धार्थ चलवादी -7022826394