बेळगाव शहरातील हनुमान नगर भागातील जाधव नगर (मोहिते जलतरण तलावाजवळ) ब घराजवळ काम करणाऱ्या एका कामगाराने आपल्यावर बिबट्याने हल्ला केल्याचा दावा केला आहे.
पोलीस आणि वनविभाग घटनास्थळी पोहोचले असून या बिबट्याचा शोध घेतला जात आहे. या हल्ल्यामध्ये किरकोळ जखमी झालेल्या माणसाच्या म्हणण्यानुसार बिबट्याने हल्ला केला असून जर हा बिबट्याच असेल तर बेळगाव शहराच्या उपनगरात बिबट्या दाखल झाला आहे असं म्हणावे लागेल.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार गवंडी काम करत असलेल्या व्यक्तीवर बिबट्याने हल्ला केला आहे या हल्ल्यांमध्ये गवंडी काम करणारा व्यक्ती किरकोळ जखमी झाला आहे.
सिद्राय लक्ष्मण निलजकर वय 38 वर्षे रा. खनगाव असे या हल्ल्यात किरकोळ जखमी झालेल्या गवंडी कामगाराचे नाव आहे.
जाधव नगर मधील सूत्राने सांगितलेल्या माहितीनुसार कामगारावर किरकोळ हल्ला केलेले बिबट्या आहे की जंगली मांजर याबाबत पकडल्या नंतरच समजणार आहे.
जाधव नगर येथील रहिवासी असलेले सामाजिक कार्यकर्ते सुजित मिळवून यांच्या घरासमोरच ही घटना घडली असून सुजित मुळगुंद यांनी हा बिबट्या रान मांजर आहे याबाबत संशय व्यक्त केला आहे.
बिबट्या….बेळगाव शहराच्या उपनगरात
हनुमान नगर येथील स्विमिंग पूल परिसरातील राहणाऱ्या लोकांना बिबट्या निदर्शनास आल्याची माहिती स्थानिकानी दिली आहे याशिवाय एका व्यक्तीवर बिबट्याने हल्ला केल्याचा प्रयत्न केला आहे. पोलीस आणि वन खात्याचे अधिकारी दाखल झाले असून बिबट्याचा शोध pic.twitter.com/6qzb3TLp5B— Belgaumlive (@belgaumlive) August 5, 2022