शहरातील माळमारुती निवासी वसाहती अंतर्गत रामनगर येथील 37 पैकी 30 भूखंडांच्या विक्रीतून महापालिकेला तब्बल 11 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असून एका भूखंडासाठी सर्वाधिक 80 लाख रुपये इतकी बोली लागल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
महापालिका महसूल विभागातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भविष्यात पुन्हा मारुती येथील भूखंडाची विक्री केली जाणार असून त्यावेळी शिल्लक 7 भूखंडांची क्रीडा प्रक्रिया पार पडणार आहे. रामनगर येथील 30 भूखंडांसाठी ज्यांनी सर्वाधिक बोली लावली आहे त्यांच्याकडून पहिल्या टप्प्यात 25 टक्के रक्कम भरून घेतली जाणार असून उर्वरित 75 टक्के रक्कम भरण्यासाठी नोटीस दिली जाईल. सदर रक्कम भरण्यासाठी 45 दिवसांची मुदत दिली जाणार आहे. महापालिकेच्या मालकीच्या 37 भूखंडांच्या विक्रीसाठी गेल्या 25 ऑगस्ट रोजी ही दिला प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. प्रत्येक भूखंडांची माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्याबरोबरच भूखंडांची मूळ बोली निश्चित करून त्यापुढे बोली लावण्याचे आवाहन करण्यात आले होते.
याआधी लोकनियुक्त सभागृह असताना महापालिकेने भूखंडांचा लिलाव केला होता. त्यावेळी लिलाव प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. गेल्या मार्च महिन्यात बुडाने केलेल्या भूखंडांच्या जाहीर मिळावा बाबत तक्रार झाली होती. महापालिकेने मात्र सर्व भूखंडांसाठी ई-लिलाव प्रक्रिया आयोजित केल्यामुळे लिलाव पारदर्शक झाल्याचा महापालिकेचा दावा आहे. रामनगर येथील सर्व भूखंड निवासी व व्यापारी उद्देशासाठी राखीव ठेवण्यात आल्याचेही महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.