सततच्या पावसामुळे जीर्ण झालेली जुनी घरे पडत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत.आता पावसाने उसंत दिली असली तरी मागील चार दिवसात सुरू असणारी पावसाची संततधार अनेक घरांसाठी अडचणीची ठरली आहे.
बेळगाव तालुक्यातील आंबेवाडी येथील लक्ष्मण साताप्पा चौगुले यांचे घर सततच्या पावसामुळे गुरुवारी रात्री कोसळले.
यामुळे चौगुले कुटुंबाचे आर्थिक नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी टाळली आहे.आंबेवाडी येथील लक्ष्मण साताप्पा चौगुले यांचे तीन खोल्यांचे राहते घर आहे .
जुने मातीचे घर असल्यामुळे सततच्या पावसाचा सदर घराला फटका बसला परिणामी अचानक सदर घराच्या भिंती कोसळल्या. आणि चौगुले कुटुंबाचा अlसरा नाहीसा झाला.
सदर घटनेची नोंद ग्रामपंचयतीत झाली असून ग्रामपंचायत अध्यक्ष चेतन पाटील, सदस्य नागू चौगुले, मधु चौगुले,दत्तू चौगुले अनिल चौगुले यांनी सदर घराची पाहणी करून त्यांना आर्थिक मदत जाहीर केली आहे.
त्यांचे साधारणतः पाच लाखाचे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे